Mohit Sharma | Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Mohit Sharma on Suryakumar: 'सूर्याने सलग 6 सिक्स मारले तरी...' 5 विकेट्स घेणाऱ्या मोहितकडून बॉलिंग प्लॅनचा खुलासा

IPL 2023 क्वालिफायर-2 सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमारला बाद करण्यामागील प्लॅनचा गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Mohit Sharma on Suryakumar Yadav Wicket: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी पराभूत केले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे गुजरातने अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे. गुजरातच्या या विजयात मोहित शर्माने महत्त्वाची कामगिरी बजावली.

गुजरातकडून मोहित शर्माने 2.2 षटके गोलंदाजी करताना 10 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने त्याला अगदी मोक्याच्या क्षणी १५ व्या षटकात गोलंदाजी दिली होती.

मुंबई इंडियन्सने त्यावेळी 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 14 षटकापर्यंत 4 विकेट्स गमावल्या होत्या, तसेच 149 धावा केल्या होत्या. तसेच त्यावेळी सूर्यकुमार यादव वेगवान खेळत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो धोकादायक वाटत होता.

पण याचवेळी 15 व्या षटकात मोहित शर्माने सूर्यकुमारला 61 धावांवर आणि विष्णू विनोदला 5 धावांवर माघारी धाडत सामन्याला गुजरातच्या बाजूने झुकवला.

दरम्यान, सामन्यानंतर मोहितनेही सूर्यकुमारची विकेट टर्निंग पाँइंट असल्याचे मान्य केले. तसेच मोहितने सूर्यकुमारविरुद्ध काय रणनीती वापरली याचाही खुलासा केला. त्याने सांगितले की त्याने त्याच्याविरुद्ध खूप प्रयोग केले नाहीत.

मोहितची प्रतिक्रिया

मोहित सामन्यानंतर म्हणाला, 'मी थोडा सुदैवीही ठरलो की मला इतक्या पटकन 5 विकेट्स मिळाल्या. चेंडू चांगला स्किड होत होता. पण सूर्यकुमार आणि तिलक वर्मा ज्यापद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहून आम्हाला वाटले होते की जर ते बाद झाले नाहीत, तर सामना निसटू शकतो.'

'मी आधीच ठरवले होते की जर मी सूर्यकुमारला गोलंदाजी करत असेल, तर त्याच्याविरुद्ध फार प्रयोग करणार नाही. आमची (गुजरात संघाची) यापूर्वी एक बैठक झाली होती, ज्यात आम्ही सूर्याविरुद्ध फार वेगळे काही न करण्याबद्दल चर्चा केली होती. कारण तसे केल्यास त्याला सोपे जाते. त्यामुळे हीच योजना होती की अधिक लेंथ बॉल त्याच्याविरुद्ध टाकायचे.'

'जरी त्याने आमच्याविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारले असते, तरी फरक पडला नसता, कारण आम्हाला वाटले की त्याला शॉट खेळण्यासाठी सर्वात कठीण लेंथ बॉल आहेत. त्याच्या विकेटनंतर सामना संपला नव्हता, पण त्याची विकेट गेल्याने आम्ही सामन्यावर पकड मिळवली होती. त्याच्या विकेटनंतर खुप हायसे वाटले होते.

'मला असे वाटते की आम्ही शेवटच्या विकेटनंतरच अंतिम सामन्याची कल्पना करू शकलो, आम्ही अनेकदा धक्कादायक परिस्थितीतून सामने जिंकले आणि हरले आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत कधीही सामना संपत नाही.'

मुंबईचा पराभव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या होत्या. गुजरातकडून शुभमन गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. तसेच साई सुदर्शन 43 धावा करून रिटायर्ड आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने नाबाद 28 धावांची खेळी केली, तर राशीद खान 5 धावांवर नाबाद राहिला. तसेच वृद्धिमान साहाने 18 धावांची खेळी केली.

त्यानंतर 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकात सर्वबाद 171 धावाच करता आल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवव्यतिरिक्त तिलक वर्माने 43 आणि कॅमेरॉन ग्रीनने 30 धावांची खेळी केली. पण या तिघांव्यतिरिक्त मुंबईकडून कोणाला दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT