Hardik Pandya and Rashid Khan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ...म्हणून हार्दिक पंड्या मॅचमधून बाहेर! राशिद करणार KKR विरुद्ध गुजरातची कॅप्टन्सी

आयपीएल 2023 मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या खेळणार नाही.

Pranali Kodre

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील १३ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पण या सामन्याच्या नाणेफेकीवेळी गुजरातचा कर्णधार म्हणून राशिद खान उतरल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कारण गुजरातचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या आहे. मात्र तो नाणेफेकीसाठी न आल्याने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, हार्दिकच्या न खेळण्याचे कारण राशिदने नाणेफेक जिंकल्यानंतर स्पष्ट केले आहे. त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर म्हटले की 'आम्ही पहिली फलंदाजी करणार आहे. ही ताजी खेळपट्टी वाटत आहे. आशा आहे की आम्ही चांगली धावसंख्या उभारून तिचा बचाव करू शकतो. हार्दिकला थोडे बरे नाहीये. आम्ही त्याच्याबद्दल जोखीम घेऊ शकत नाही.

'आम्ही एक संघ म्हणून चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. आम्ही आज एकच बदल केला आहे. हार्दिक ऐवजी विजय शंकरला संधी दिली आहे.'

गुजरातचा हा या हंगामातील तिसरा सामना आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आणि दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले आहे. त्यामुळे सध्या गुजरातचे सलग दोन विजयांसह ४ गुण आहेत. गुजरातच्या संघाने आजच्या सामन्यासाठी राशिदव्यतिरिक्त डेव्हिड मिलर आणि अल्झारी जोसेफ या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

तसेच केकेआरने या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. त्यांनी टीम साऊदी ऐवजी लॉकी फर्ग्युसनला संधी दिली आहे, तर मनदीप सिंग ऐवजी एन जगदीशनला संधी मिळाली आहे. केकेआरचा देखील हा या हंगामातील तिसरा सामना असून त्यांना पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले होते.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान (कर्णधार), मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल

  • कोलकाता नाईट रायडर्स - रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT