MS Dhoni & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: हाय व्होल्टेज सामन्यानंतर विराट-धोनीच्या फॅन्सला सुखावणारी पाहा 'माहीराट' मोमेंट

Pranali Kodre

MS Dhoni and Virat Kohli Video Viral: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात सीएसकेने अखेरच्या षटकात 8 धावांनी विजय मिळवला. या हाय व्होल्टेज सामन्यानंतर मात्र चाहत्यांना सुखावणारी दृश्य पाहायला मिळाले.

या सामन्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली एकमेकांबरोबर गप्पा मारताना दिसले होते. त्यांचा गप्पा मारतानाचा व्हिडिओही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरलही होत आहे.

हा व्हिडिओ पाहून लक्षात येते की धोनी आणि विराट यांच्यात काहीतरी हलकी-फुलकी चर्चा होत आहे. ते एकमेकांबरोबर चर्चा करत असताना हसतही आहेत. तसेच त्यांच्यातील घट्ट मैत्रीही या व्हिडिओतून दिसून येत आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की 'एक दिग्गज जोडी'. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक युजर्सही या व्हिडिओवर 'माहिराट मुमेंट' असेही कमेंट केल्या आहेत.

खरंतर सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्यावेळी बरेच चाहते एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या भेटीचीही उत्सुकतेने वाट पाहात असतात. हे दोन खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात असले, तरी त्यांची मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे.

त्यांच्या चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला 'माहिराट' हे नावही दिले असून या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांमध्ये याच टोपननावाने ओळखली जाते.

सीएसकेने जिंकला अटीतटीचा सामना

सोमवारी झालेल्या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 226 धावा केल्या होत्या. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. तसेच शिवम दुबेने 52 धावांची खेळी केली.

त्यानंतर 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफानी फलंदाजी करताना 61 चेंडूत 126 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने 76 धावांची खेळी केली, तर डू प्लेसिसने 62 धावांची खेळी केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीच्या अन्य फलंदाजांना संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात अपयश आले. त्यामुळे आरसीबीला 20 षटकात 8 बाद 218 धावाच करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT