SRH Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: सॉल्ट-मार्शची शतकी भागीदारी व्यर्थ! हैदराबादने दिल्लीचा घरच्या मैदानात केला पराभव

आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अखेरच्या षटकात रोमांचक विजय मिळवला.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील शनिवारी (29 एप्रिल) दोन सामने झाले. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 9 धावांनी विजय मिळवला आहे. हा हैदराबादचा या हंगामातील तिसरा विजय ठरला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 6 बाद 188 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मिचेल मार्शने शानदार अष्टपैलू कामगिरी केली होती. पण तरी त्याची ही कामगिरी दिल्ली विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.

या सामन्यात 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरबरोबर फिलिप सॉल्ट उतरला होता. पण दिल्लीला डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. वॉर्नरला भुवनेश्वर कुमारने शुन्यावरच माघारी धाडले.

पण त्यानंतर सॉल्टसह मिचेल मार्शने फलंदाजी करताना दिल्लीचा डाव सावरला. त्यांनी फक्त डाव सावरलाच नाही, तर शतकी भागीदारी करत दिल्लीला भक्कम स्थितीत आणले होते. यादरम्यान या दोघांनीही अर्शतकेही पूर्ण केली.

पण त्यांची धोकादायक भागीदारी 12 व्या षटकात मयंक मार्कंडेने तोडली. त्याने स्वत:च्याच चेंडूवर सॉल्टचा झेल घेतला. त्यामुळे सॉल्ट आणि मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेली 112 धावांची भागीदारी तुटली. सॉल्टने 35 चेंडूत 9 चौकारांसह 59 धावा केल्या.

यानंतर मात्र दिल्लीने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मनिष पांडे 1 धाव करून परतला. तसेच 14 व्या षटकात मार्शही बाद झाला. मार्शने 39 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांसह 63 धावांची खेळी केली.

यानंतर प्रियम गर्ग (12) आणि सर्फराज खानही (9) स्वस्तात माघारी परतले. अखेरीस अक्षर पटेलने रिपल पटेलला साथीलला घेत विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अक्षर 29 धावांवर आणि रिपल 11 धावांवर नाबाद राहिले.

हैदराबादकडून मयंक मार्कंडेने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 20 धावाच देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, अकिल हुसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवातही फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी पॉवर-प्लेच्या षटकातच मयंक अगरवाल (5) आणि राहुल त्रिपाठी (10) यांच्या विकेटस गमावल्या होत्या. तसेच मिचेल मार्शने टाकलेल्या १० व्या षटकात हैदराबादने कर्णधार एडेन मार्करम (8) आणि हॅरी ब्रुक (0) या दोघांच्याही विकेट्स गमावल्या होत्या.

पण असे असतानाही सलामीला खेळायला आलेल्या अभिषेक शर्माने एक बाजू भक्कमपणे सांभाळताना आक्रमक फटके खेळले. त्याने अर्धशतकी खेळीही साकारली. पण त्याला 12 व्या षटकात अक्षर पटेलने बाद केले. अभिषेकने 36 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची खेळी केली. तो बद झाल्यानंतर हेन्रिक क्लासेनने जबाबदारी स्विकारत आधी अब्दुल सामद आणि नंतर अकिल हुसेनला बरोबर घेतले.

सामद क्लासेनला चांगली साथ देत असतानाच 17 व्या षटकात 28 धावांवर बाद झाला. पण नंतर फलंदाजीला आलेल्या हुसेननेही क्लासेनची चांगली साथ दिली. क्लासेनने या दरम्यान आक्रमक अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे 20 षटकात हैदराबादला 6 बाद 197 धावा करता आल्या. क्लासेनने 27 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावांची नाबाद खेळी केली. तसेच हुसेन 16 धावांवर नाबाद राहिला.

दिल्लीकडून मिचेल मार्शने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 27 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT