MS Dhoni | Gautam Gambhir  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'गौतम आज इतका गंभीर का?', चेन्नईत धोनीने दोन सलग सिक्स ठोकल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

CSK vs LSG: सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनीने सलग 2 षटकार मारले.

Pranali Kodre

MS Dhoni Two Sixes: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने 12 धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने मारलेल्या दोन षटकारांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात सीएसके प्रथम फलंदाजीसाठी उतरले होते. त्यांच्याकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामी जोडीने 110 धावांची भागीदारी रचत दमदार सुरुवात केली होती. ऋतुराजने 57 धावांची आणि कॉनवेने 47 धावांची खेळी केली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या षटकांमध्ये सीएसकेने काही झटपट विकेट्स गमावल्या.

तसेच रविंद्र जडेजा अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे धोनी फलंदाजीला आला. त्याने फलंदाजीला आल्या आल्या पहिल्या दोन चेंडूवरच दोन षटकार मारले आणि तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. पण यादरम्यान लखनऊ संघाचा मार्गदर्शक असलेला गौतम गंभीर निराश झाला होता.

त्याचे निराश होणे साहाजिक होते, कारण धोनीच्या दोन षटकारांनी सीएसकेला २१५ धावांपर्यंत पोहचवले होते. तो बाद झाल्यानंतर सीएसके संघ 20 षटकात 7 बाद 217 धावा उभारू शकला.

दरम्यान, धोनीने दोन षटकार ठोकल्यानंतर गंभीरचा चेहरा पडल्याने अनेक सोशल मीडिया युजर्सने ट्रोल केले आहे. तसेच काही मीम्सही शेअर केले आहेत. काहींनी याचा संबंध 2011 वर्ल्डकपमधील अंतिम सामन्याशीही जोडला आहे.

2011 वर्ल्डकप जिंकण्यासाठी अनेकदा एमएस धोनीला श्रेय दिले जाते. त्यावेळी अंतिम सामन्यात धोनीने विजयी षटकार ठोकला होता. तसेच तो 91 धावांवर नाबाद राहिला होता. त्यामुळे धोनीचा तो षटकार आयकॉनीक मानला जातो. धोनीला 2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.

पण याच सामन्यात गौतम गंभीरने 97 धावांची खेळी केली होती. तसेच धोनी आणि गंभीर यांच्यात 109 धावांची भागीदारी झाली होती. त्यामुळे अनेकदा हा वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी केवळ धोनीला श्रेय देण्याबद्दल गौतम गंभीरच्या चाहत्यांकडून टीका होत असते. अनेकदा गंभीरनेही याबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्याचमुळे याच एका गोष्टीमुळे धोनी आणि गंभीरच्या चाहत्यांमध्ये वादही होत असतात.

सोमवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास सीएसकेने दिलेल्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकात 7 बाद 205 धावा करता आल्या. लखनऊकडून काईल मेयर्सने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली, तसेच निकोलस पूरनने 32 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा पार करता आला नाही. सीएसकेकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT