IPL 2023: आयपीएल 2023 चा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. सीएसकेने सलामीच्या सामन्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे.
शुक्रवारी, फ्रँचायझीने सांगितले की, मुकेश चौधरीच्या जागी डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज आकाश सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे.
गेल्या मोसमात आयपीएल (IPL) पदार्पणात 16 विकेट घेणारा मुकेश स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बरा होत आहे. त्यामुळे तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या सीझनमधून बाहेर पडला आहे.
राजस्थानमधील भरतपूर येथे जन्मलेला, 20 वर्षीय आकाश सिंग भारताच्या अंडर-19 विश्वचषक संघाचा एक भाग होता. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्समध्ये होता.
जिथे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत 9 लिस्ट ए सामन्यात 14 विकेट्स, 5 फर्स्ट क्लासमध्ये 10 विकेट्स आणि 9 टी-20 मध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. तो 20 लाख रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला.
तसेच, विश्वचषक 2020 च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताच्या U-19 संघाचा सदस्य आकाश सिंग याला आयपीएल 2020 च्या आधीच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 20 लाख रुपयांना विकत घेतले होते.
त्यानंतर, त्याला आयपीएल 2021 साठी कायम ठेवण्यात आले. जरी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, त्याने अंडर 19 विश्वचषकात 7 विकेट्स घेतल्या होत्या.
आकाशने जयपूरमध्ये क्रिकेटची तयारी केली होती. येथे 2017 मध्ये अकादमीकडून खेळताना खुल्या स्पर्धेत त्याने एका सामन्यात एकही धाव न देता 10 विकेट घेतल्या होत्या. यानंतर त्याची 16 वर्षांखालील आणि 10 वर्षांखालील संघात निवड झाली.
याशिवाय, आकाशला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. त्यामुळे त्याला अभ्यास करावासा वाटला नाही. यामुळेच तो दहावीच्या परीक्षेत अनेकदा नापास झाला होता. त्याने राजस्थानसाठी 16 वर्षाखालील, 19 वर्षांखालील संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.