Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

Video: 34 वर्षांच्या रहाणेची 'सुपर' फिल्डिंग ठरली CSK च्या विजयाचं कारण! कसं ते एकदा पाहाच

Video: सोमवारी चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मिळवलेल्या विजयात अजिंक्य रहाणेच्या क्षेत्ररणाचाही मोठा वाटा राहिला.

Pranali Kodre

Ajinkya Rahane Fielding Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अटीतटीचा सामना पार पडला. रोमांचक झालेल्या या सामन्यात सीएसकेने अखेरच्या षटकात 8 धावांनी विजय मिळवला. सीएसकेच्या या विजयासाठी अजिंक्य रहाणेच्या क्षेत्ररणाचाही मोठा वाटा राहिला.

या सामन्यात सीएसकेने आरसीबीसमोर विजयासाठी 228 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून काही झेल सुटले होते. तसेच क्षेत्ररक्षणादरम्यान काही चूका झाल्या. पण असे असतानाही रहाणेने मात्र सीएसकेकडून खेळताना अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले.

सध्या 34 वर्षीय रहाणेच्या या सामन्यातील क्षेत्ररक्षणादरम्यानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रहाणेने सीमारेषेजवळ एक ग्लेन मॅक्सवेलचा षटकार आडवताना दिसत आहे. रहाणेच्या या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही शेअर करण्यात आला आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने आरसीबीसमोर विजयासाठी 227 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चौकार-षटकारांची बरसात करत तुफानी फटकेबाजी करत 126 धावांची भागीदारी केली.

त्यांच्या या फटकेबाजीने आरसीबीच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण त्यांची भागीदारी रंगलेली असताना 9व्या षटकात रविंद्र जडेजाने टाकलेल्या 5 व्या चेंडूवर मॅक्सवेलने मोठा फटका खेळला. त्याचा फटका पाहाता तो चेंडू षटकारासाठीच जाईल असे अनेकांना वाटले होते.

मात्र, सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या रहाणेने वर उंच उडी मारली आणि चेंडू पकडत तो स्वत: नियंत्रण गमावून सीमारेषेच्या आत खाली पडल्यापूर्वी त्याने तो चेंडू मैदानात फेकला. त्यामुळे या चेंडूवर षटकार जाण्यापासून वाचला. यावेळी मॅक्सवेल आणि फाफ यांनी केवळ एकेरी धाव काढली. त्यामुळे रहाणेने त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने ५ धावा वाचवल्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सीएसकेने हा सामना अखेरच्या षटकात केवळ 8 धावांनी जिंकला. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तसेच क्रिकेट तज्ञांनी रहाणेने केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करताना त्याने अडवलेल्या 5 धावा महत्त्वाच्या ठरल्याचे म्हटले.

त्याने या 5 धावा वाचवल्यानंतर काही वेळाने 13 व्या षटकात मॅक्सवेल 76 धावांवर आणि फाफ 14 व्या षटकात 62 धावांवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र, आरसीबीच्या अन्य फलंदाजांना संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. आरसीबीने 20 षटकात 8 बाद 218 धावा केल्या.

रहाणेची फलंदाजीतही कमाल

या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 226 धावा केल्या. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. तसेच शिवम दुबेने 52 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय अजिंक्य रहाणेनेही फलंदाजीत चमक दाखवताना 20 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्याने कॉनवेबरोबर 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT