MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Video: लखनऊमध्ये 'कॅप्टनकूल'ला मिळाला स्पेशल अ‍ॅवॉर्ड, BCCI उपाध्यक्षांकडून झाला सन्मान

Pranali Kodre

MS Dhoni felicitated in Lucknow: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी 45 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार होता.

पण लखनऊ संघ फलंदाजी करत असताना पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द करण्यात आला. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचा सन्मान करण्यात आला.

हा धोनीचा या मैदानावरील पहिलाच सामना होता, यापूर्वी तो या मैदानावर खेळला नव्हता. त्याचा या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर मैदानाच्या सीमारेषेबाहेर सन्मान करण्यात आला. त्याला यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.

या सन्मान सोहळ्याचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.

धोनीने केले चाहत्यांना खूश

या सामन्यात नाणेफेक धोनी जिंकला होता आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रेझेंटेटर डॅनी मॉरिसन यांनी त्याला चाहते त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे समजून ज्याप्रकारे त्याला पाठिंबा देत आहे, त्याची तो मजा घेतोय का, अशा अर्थाचा प्रश्न विचारला.

त्यावर धोनी म्हणाला, 'तुम्हीच हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचे ठरवले आहे, मी नाही.' यानंतर तो हसला. त्यानंतर मॉरिसन यांनी तो परत येणार आहे, असं प्रेक्षकांना सांगितले.

धोनीने आता हे विधान केल्याने त्याने तो पुढील हंगामातही दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे त्याचे चाहतेही खूश आहे.

पण असे असले तरी यापूर्वी धोनीने हा त्याचा अखेरचा हंगाम असू शकतो, असेही संकेत दिले होते. त्यामुळे आता त्याचा आयपीएलमधून निवृत्तीबद्दल अंतिम निर्णय नक्की काय असणार आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

सामना रद्द

या सामन्यात नाणेफेकीलाही पावसामुळे उशीर झाला होता. मात्र 19.2 षटकात लखनऊने 7 बाद 125 धावा केल्या असताना पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर हा सामना पुन्हा सुरू झाला नाही. अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लखनऊकडून आयुष बदोनीने सर्वाधिक नाबाद 59 धावा केलेल्या होत्या. तसेच चेन्नईकडून मोईन अली, मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT