IPL 2023: आयपीएल 2023 चा हंगाम 31 मार्चपासून सुरु होत आहे. याआधी आरसीबीचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे.
त्याने केलेले विधान जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरे तर, एबीने विराटचे वर्णन गर्विष्ठ आणि अहंकारी असे केले आहे. 2011 मध्ये झालेल्या पहिल्या बैठकीचा संदर्भ देत त्याने हे विधान केले.
एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला की, 'जेव्हा मी विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो थोडा गर्विष्ठ आणि अहंकारी वाटला. मात्र, जेव्हा मी त्याला खेळताना पाहिले तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर वाढला.'
खरे तर, आयपीएल 2023 सुरु होण्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या सन्मानार्थ 'RCB अनबॉक्स' नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
जो बंगळुरुच्या होम ग्राउंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो चाहते उपस्थित होते. यादरम्यान, एबी आणि गेल यांना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) अनेक वर्षे आयपीएलमध्ये आरसीबीसाठी एकत्र खेळले आहेत. या दोन खेळाडूंमध्ये एक वेगळ्या प्रकारचा बंध आहे. दोघांची मैत्रीही सर्वश्रुत आहे. हे खेळाडू मैदानात आले की, गोलंदाज थर-थर कापायचे. मात्र, यावेळी डिव्हिलियर्स खेळताना दिसणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.