Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: विराट कोहलीने जसप्रीत बुमराहकडे केले होते दुर्लक्ष, माजी RCB खेळाडूने सांगितला किस्सा

भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा बुमराह केंद्रबिंदू आहे. 2018 मध्ये बुमराहने कसोटी पदार्पण केले.

दैनिक गोमन्तक

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आज भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा अविभाज्य भाग आहे . त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उदय अभूतपूर्व होता. 2015 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) चमकदार कामगिरी केल्यानंतर बुमराहचा जानेवारी 2016 मध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला जास्त संघर्ष करावा लागला नाही आणि लवकरच लाइन लेन्थवर ताबा मिळवला. आता तो भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा केंद्रबिंदू आहे. 2018 मध्ये बुमराहने कसोटी पदार्पण केले. गेल्या तीन वर्षांत त्याने कसोटी क्रिकेटमध्येही छाप सोडली आहे.

बुमराहच्या यशाचे मोठे कारण म्हणजे त्याची मेहनत आणि कौशल्य. पण याचे काही श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही (Virat kohli) जाते . एमएस धोनीच्या (MS Dhoni)नेतृत्वाखाली भारतासाठी सुरुवात करणारा बुमराह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वेगळ्या फॉर्ममध्ये दिसला. विराट त्याचा मोठा समर्थक आहे. पण एक वेळ अशी आली की विराटने बुमराहकडे दुर्लक्ष केले. हा किस्सा आरसीबीचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने शेअर केला आहे .

विराट म्हणाला- बुमराह-वुमराह काय करणार?

मीडियाशी संवाद साधताना पार्थिव पटेल म्हणाला, मी 2014 मध्ये आरसीबीचा (RCB) भाग होतो, मी विराट कोहलीला सांगितले की मुंबई संघात बुमराह नावाचा गोलंदाज आहे, तुम्ही त्याला पाहिले आहे का? विराट म्हणाला, सोड यार, हे बुमराह-वुमराह काय करणार. पार्थिव हा गुजरातच्या स्थानिक संघात बुमराहचा कर्णधार होता आणि त्याने पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये त्याचा जोश पाहिला. पार्थिव म्हणतो की बुमराहने खूप संघर्ष केला, जो भारतीय संघाचा फास्टर गोलंदाज बनला.

पार्थिव पटेलच्या मते, जेव्हा त्याची पहिल्यांदा निवड झाली तेव्हा बुमराह पहिली 2-3 वर्षे रणजी ट्रॉफी खेळला होता. 2013 हे त्याचे रणजीमधील पहिले वर्ष होते आणि 2014 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले नव्हते. त्यानंतर 2015 हे वर्ष त्याच्यासाठी इतके वाईट ठरले की त्याला मध्यंतरी मायदेशी पाठवावे लागले. त्याच्या मेहनतीचे आणि क्रिकेटवरील प्रेमाचे फळ आहे ज्यामुळे त्याला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मुंबईने समोर आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT