Marcus Stoinis Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: ‘रोमॅंटिक मोमेंट’ स्टॉइनिसचा षटकार पाहून गर्लफ्रेंडने मारली उडी

आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सामना शनिवारी मुंबई इंडियन्सशी झाला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सामना शनिवारी मुंबई इंडियन्सशी झाला. या सामन्यात लखनौने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना धाकात ठेवले. लखनौने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 199 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) शतक झळकावले. सामन्याच्या शेवटी फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने (Marcus Stoinis) नऊ चेंडूत केवळ 10 धावा केल्या, तरीही त्याच्या बॅटमधून बाहेर पडणारे षटकार पाहण्यासारखे होते. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मार्कस स्टॉइनिसने छोटी इनिंग खेळली मात्र त्याने चाहत्यांना निराश केले नाही. स्टॉइनिसने येताच पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला. त्याचा हा शॉट पाहून चाहत्यांसह त्याची गर्लफ्रेंडही चकीत झाली. विशेष म्हणजे षटकार मारताना स्टॉइनिसने तिच्याकडे पाहिले. (IPL 2022 The girlfriend was surprised to see Marcus Stoinis hit a six)

स्टॉइनिसचा षटकार पाहून गर्लफ्रेंडने उडी मारली

14 व्या षटकात स्टॉइनिस फलंदाजीला आला. मनीष पांडेच्या शानदार खेळीनंतर तो मैदानात आला. एम अश्विनच्या षटकात स्टॉइनिस फलंदाजीला आला. पहिल्या चेंडूचा सामना करत त्याने गुगली चेंडूवर पूर्ण ताकदीने षटकार मारला. त्याचा तो षटकार 104 मीटर लांब गेला. षटकार मारल्यानंतर तो क्रिजच्या मधोमध आला आणि राहुलशी बोलत असतानाच गर्लफ्रेंडकडे पाहत त्याने प्रेम व्यक्त केले. गर्लफ्रेंड सारा कझार्नुकही तिथे हसत उभी होती.

तसेच, स्टॉइनिस स्पोर्ट्स अँकर स्टेफनी म्युलरसोबत गेल्या वर्षापर्यंत रिलेशनशिपमध्ये होता. दोघे बराच काळ एकत्र होते आणि विशेष म्हणजे लग्न करणार होते पण गेल्या वर्षी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर स्टोइनिसने साराला डेट करण्यास सुरुवात केली. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत, ज्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: गाढ वाचेने करू गाढवाचे गुणगान!

Students Stress: न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवापिढी मनाने कमकुवत झाली आहे का?

Goa–London Flight: गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार! गोमंतकीयांसाठी खुशखबर; Air Indiaची मिळणार सेवा

Goa: स्‍वदेशी वस्‍तूंना प्राधान्‍य द्या, देश बळकटीत सहभागी व्‍हा! पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन

Asia Cup 2025: शुभमन गिल, अय्यरचे काय करायचे? निवड समितीसमोर प्रश्न; जयस्वालबाबतही करावा लागणार विचार

SCROLL FOR NEXT