कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने अधिकृतरीत्या घोषित केले आहे की, श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये संघाचा कर्णधार असेल. श्रेयस अय्यरला केकेआरने एका मेगा लिलावात 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयस अय्यरने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. इऑन मॉर्गन गेल्या मोसमात केकेआरचा कर्णधार होता, त्याला फ्रँचायझी संघाने कायम ठेवले नव्हते.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आयपीएल 2022 हंगामासाठी आपला नवीन कर्णधार घोषित केला आहे. केकेआरने संघाची कमान भारतीय फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) सोपवली आहे. केकेआरने श्रेयसला मेगा ऑक्शन (IPL 2022 ऑक्शन) मध्ये 12.25 कोटी रुपयांना खरेदी केले. कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी, 16 फेब्रुवारी रोजी एका ट्विटद्वारे केली.
अय्यर केकेआरचा कर्णधार म्हणून इयॉन मॉर्गनची जागा घेतील, ज्याने गेल्या हंगामात संघाला अंतिम फेरीत नेले होते. मात्र, फलंदाजीत अपयश आल्याने कोलकाताने मॉर्गनला कायम ठेवले नाही आणि या वेळी लिलावात पुन्हा खरेदीही केली नाही. केकेआर नवीन कर्णधाराच्या शोधात होता आणि या प्रयत्नात फ्रँचायझीने अय्यरला विकत घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली. इऑन मॉर्गन यावेळी मेगा लिलावात होता पण तो विकला गेला नाही. श्रेयस अय्यरपूर्वी पाच खेळाडूंनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly) केकेआरचा पहिला कर्णधार होता, त्यानंतर गौतम गंभीर, ब्रेंडन मॅक्युलम, दिनेश कार्तिक आणि मॉर्गन होते.
श्रेयस अय्यर गेल्या मोसमापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता आणि दुसऱ्यांदाच लिलावात आला होता. 2018 च्या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार बनवले आणि त्यानंतर 2020 हंगामात त्याने संघाला अंतिम फेरीत नेले. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला, जिथे त्यांना मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला.
केकेआर चा असा असेल संघ : श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, प्रथम सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, अजिंक्य रहाणे, अनुकुल रॉय, अॅलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, टिम साऊदी, उमेश यादव, आर. सिंग, पॅट कमिन्स, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन, बाबा इंद्रजीत, अभिजित तोमर, अशोक शर्मा, रमेश कुमार, सुनील नरेन.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.