MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

CSK vs PBKS: एव्हरग्रीन फिनिशर धोनीचा डाव फसला, पंजाब किंग्सकडून चेन्नईचा पराभव

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्जने एका रोमांचक सामन्यात चेन्नईचा 11 धावांनी पराभव केला. CSK ला शेवटच्या षटकात 27 धावांची गरज होती, एमएस धोनी क्रीजवर होता पण तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि चेन्नईच्या आशा पल्लवित झाल्या.

या सामन्यात (IPL 2022) पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा केल्या होत्या, तर पंजाबकडून शिखर धवनने 88 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला केवळ 176 धावा करता आल्या आणि 11 धावांनी सामना गमवावा लागला. चेन्नई सुपर किंग्जचा सहावा पराभव असून आता त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.

शेवटच्या दोन षटकात 35 धावा हव्या होत्या

चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या 12 चेंडूत 35 धावांची गरज होती आणि एमएस धोनी, रवींद्र जडेजा क्रीजवर होते. अर्शदीप सिंगने या षटकात केवळ 8 धावा दिल्या, ज्यात एमएस धोनीने लगावलेला चौकाराचा समावेश होता. अशा स्थितीत चेन्नईला शेवटच्या षटकात 27 धावांची गरज होती आणि पंजाबसाठी ऋषी धवनला गोलंदाजीसाठी आणले, ज्याने शानदार गोलंदाजी करत संघाला सामना जिंकून दिला.

या सामन्यात पंजाब किंग्जने जबरदस्त फलंदाजी केली आणि संघाचा 'गब्बर' शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांवर कहर केला. शिखर धवनने आपल्या पहिल्या डावात 88 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 59 चेंडूत 2 षटकार, 9 चौकार लगावले. पंजाबची सुरुवात संथ झाली आणि कर्णधार मयंक अग्रवालही (18 धावा) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण यानंतर धवन आणि भानुका राजपक्षे यांच्यात 71 चेंडूत 110 धावांची भागीदारी झाली. भानुकाने आपल्या डावात 32 चेंडूत 42 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने अवघ्या 7 चेंडूत 19 धावा केल्या आणि अखेरच्या सामन्यात संघाला झटपट धावा मिळवून दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT