Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Dewald Brevis ने रोहित शर्माला 'उत्तम कर्णधार' म्हणत केलं कौतुक

Dewald Brevis On Rohit Sharma: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने अंडर-19 विश्वचषकात उत्तम कामगिरी केली.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) ने रोहित शर्मावर मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा कर्णधार म्हणून हुशार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. तो पुढे म्हणाला, रोहित शर्मा आपल्या खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. तो आपल्या खेळाडूंवर दबाव निर्माण होऊ देत नाही. तसेच, डेवाल्ड ब्रेविस म्हणाला की, मुंबई इंडियन्स हा नेहमीच त्याच्या आवडत्या संघांपैकी एक आहे. या संघात सर्व मोठे खेळाडू कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतात. (Dewald Brevis On Rohit Sharma News)

* ब्रेविसला मुंबई इंडियन्सने 3 कोटींना घेतले विकत

आयपीएल (ILP 2022) मेगा लिलाव 2022 मध्ये, मुंबई इंडियन्सने डेवाल्ड ब्रेविसला Dewald Brevis) 3 कोटी रुपयांना खरेदी केले. यंदा डेवाल्ड ब्रेव्हिसने काही सामन्यांमध्ये शानदार खेळी केली. डेवाल्ड ब्रेविसने या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकूण 161 धावा केल्या. त्याने आपल्या मोठ्या फटकेबाजीच्या क्षमतेने खूप प्रभावित केले. पण यावेळी डेवाल्ड ब्रेविसला सर्व सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. ब्रेव्हिसने यावेळी 11 षटकार ठोकले. विशेष म्हणजे या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma ) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होती. 5 वेळचा चॅम्पियन संघ यावेळी प्लेऑफसाठी क्वाॅलीफाय ठरू शकला नाही.

* अंडर-19 विश्वचषकात 506 केल्या धावा

डेवाल्ड ब्रेविसने अंडर-19 विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. ब्रेव्हिसने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक शानदार खेळी खेळल्या. यावेळी अंडर-19 विश्वचषकात त्याने 506 धावा केल्या. अंडर-19 विश्वचषकात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे यावेळी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी खूपच खराब झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा 5 वेळचा चॅम्पियन संघ केवळ 5 सामने जिंकू शकला. तर 10 सामन्यांत या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यंदा मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

Shani Margi 2025: कर्मफल दाता शनीची चाल 138 दिवसांनंतर बदलली! 'या' 5 राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, नोकरीत बढतीचाही योग

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

IFFI Goa 2025: इफ्फीच्या रेड कार्पेटवर धनुष-क्रिती सेनॉनचा जलवा; 'तेरे इश्क में'च्या गाला प्रीमिअरला लावली हजेरी! Watch Video

SCROLL FOR NEXT