Vanind Hasaranga Ipl Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2022: 'हा' आहे सर्वात महागडा खेळाडू

दैनिक गोमन्तक

IPL 2022 साठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात अनेक युवा खेळाडूंना मोठी रक्कम मिळणार आहे. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक 12.25 कोटी देऊन विकत घेतले. त्याच वेळी, अनेक संघ श्रीलंकेचा (Sri lanka) अष्टपैलू वनिंदू हसरंगासाठी बोली लावत आहेत आणि तो विक्रमी रकमेकडे वाटचाल करत आहे. वनिंदू हसरंगाला त्याच्या जुन्या फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले.(Vanind Hasaranga Ipl)

तथापि, वनिंदू हसरंगाच्या बोलीच्या वेळी, लिलावकर्ता ह्यू एडमीड्स स्टेजवरून बेहोश झाले, त्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला. वैद्यकीय पथक अॅडम्सवर उपचार करत असून सध्या जेवणाची सुट्टी घेण्यात आली.

हसरंगाने T20 क्रिकेटमध्ये 84 सामन्यात 113 विकेट घेतल्या आहेत. हसरंगा हा लिलावात आतापर्यंतचा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे.

वानिंदू हसरंगा गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात आपल्या चमकदार कामगिरीने चर्चेत आला होता. यानंतरही गेल्या अनेक मालिकांमध्ये दमदार कामगिरी करत हसरंगाने आयपीएल लिलावात आपला ठसा उमटवला. त्याची प्रतिभा पाहुन अनेक संघांच्या नजरा श्रीलंकेच्या या खेळाडूवर खिळल्या होत्या. आता हसरंगा आयपीएल(Ipl) 2022 मध्ये आपली शानदार गोलंदाजी करताना दिसणार आहे. तो सध्या श्रीलंकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.

भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिकलसाठी सर्व फ्रँचायझींमध्ये चांगलीच स्पर्धा होती. शेवटी, राजस्थान रॉयल्सने त्याला 7.75 कोटी रुपयांना खरेदी केले. वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरलाही राजस्थानने 8.5 कोटींना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. सलामीवीर क्विंटन डी कॉकला लखनौ फ्रँचायझीने 6.75 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला 7.25 कोटींना, आफ्रिकन गोलंदाज कागिसो रबाडाला पंजाब किंग्सने 9.25 कोटींना, शिखर धवनला पंजाब किंग्सने 8.25 कोटींना, राजस्थान रॉयल्सने आर अश्विनला 5 कोटींना खरेदी केले. .

दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाला लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याची मूळ किंमत ही 2 कोटी रुपये होती. गेल्या मोसमापर्यंत तो चेन्नईसोबत होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ, फलंदाज डेव्हिड मिलरला आयपीएलमध्ये खरेदीदार मिळालेला नाही. हे सर्व खेळाडू दिग्गज आहेत, मात्र त्यांचे नशीब खुलले नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांना खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT