IPL 2021: Virat Kohli steps down as RCB captain Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, RCB चं कर्णधारपदही सोडलं

विराटने (Virat Kohli) आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) कर्णधारपदाचा देखील राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे

दैनिक गोमन्तक

क्रिकेटपटू विराट कोहलीने ( Virat Kohli) पुन्हा एकदा आपल्या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.टीम इंडियाच्या (Team India) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटने आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) कर्णधारपदाचा देखील राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. कोहली आयपीएल -2021 (IPL 2021) मध्ये शेवटच्या वेळी आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.(IPL 2021: Virat Kohli steps down as RCB captain)

कोहली म्हणाला, 'आरसीबीचा कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल असेल.मात्र मी टीमध्ये असेलच जोपर्यंत मी माझा शेवटचा IPL सामना खेळत नाही तोपर्यंत मी RCB खेळाडू राहीन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व RCB चाहत्यांचे आभार मानतो.'

आरसीबीने प्रतिभावान खेळाडूंनी भरलेला हा एक अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवास होता. आरसीबीचे आभार मानण्यासाठी मी ही संधी घेऊ इच्छितो. व्यवस्थापन, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, खेळाडू आणि संपूर्ण आरसीबी कुटुंबाने गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. हा सोपा निर्णय नव्हता. RCB माझ्या हृदयाच्या जवळ आहे. असे सांगत विराटने आपला निर्णय जाहीर केला आहे.

त्याचवेळी, आरसीबीने एक निवेदन जारी केले, 'विराट कोहलीने आयपीएल -2021 नंतर कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. कोहली फ्रँचायझीमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तो आरसीबी संघाचा भाग राहील.

आरसीबीचे सीईओ प्रथमेश मिश्रा म्हणाले, 'विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे नेतृत्व कौशल्य अभूतपूर्व आहे. आम्ही या निर्णयाचा आदर करतो आणि त्याचे समर्थन करतो आणि आरसीबी नेतृत्व गटामध्ये अविश्वसनीय योगदानाबद्दल विराटचे आभार मानू इच्छितो. विराट कोहलीने 2013 मध्ये आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले. 8 वर्षांपासून तो ही जबाबदारी सांभाळत आहे.

16 सप्टेंबर रोजी विराट कोहलीने टी -20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे माहिती दिली की, तो यापुढे विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहणार नाही. कामाच्या ताणामुळे कोहलीने एका स्वरूपात कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या 32 वर्षीय अनुभवीला त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT