या खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने या खेळाडूंच्या संघ मालकांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: स्मिथ, वॉशिंगटन, गिल आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challenger Bangalore) हिस्सा असलेला वॉशिंगटन सुंदर इंग्लंडमधील अभ्यास सामन्यात जायबंदी झाला आहे. तर कोलकाता नाइट राइडर्सचा (Kolkata Knight Riders) सलामी फलंदाज शुभमन गिल देखील जखमी झाल्याने इंग्लंड विरुध्दच्या मालिकेतून बाहेर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या टप्प्याला 19 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. परंतु यावेळी अनेक खेळाडू आपल्या देशाकडून खेळण्यासाठी किंवा जायबंदीच्या कारणाने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे याचे आयपीएलच्या संघ मालकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा हिस्सा असलेला वॉशिंगटन सुंदर इंग्लंडमधील अभ्यास सामन्यात जायबंदी झाला आहे. तर कोलकाता नाइट राइडर्सचा सलामी फलंदाज शुभमन गिल देखील जखमी झाल्याने इंग्लंड विरुध्दच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा जलदगती गोलंदाज अवेश खान हा देखील सराव सामन्यावेळी जखमी झाल्याने याला देखील मुकावे लागणार आहे. त्याच दिल्लीचा आणखीन एक खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा कोपऱ्य़ाच्या दुखापतीमुळे आयपाएलमध्ये सहभागी होणार नाही. कोलकात्याचा कर्णधार इयोन मोर्गन हा देखील आयपाएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.

या खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने या खेळाडूंच्या संघ मालकांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कर्णधार आणि संघ मालकांना या खेळाडूंचे रिप्लेसमेंट शोधावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT