IPL 2021 च्या 47 व्या सामन्यात RR ने CSK चा 7 गडी राखत पराभव केला. अबू धाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला(CSKvsRR). प्रथम फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या.आणि याच स्कोर कार्डचा पथ्कग करत राजस्थानने 17.3 षटकांत 3 विकेट गमावून 190 धावांचे लक्ष्य गाठले. य सामन्यात शिवम दुबे 64 आणि ग्लेन फिलिप्स 14 धावांवर नाबाद राहिले.(IPL2021: RR beat CSK by 7 wickets)
राजस्थानचा हा या IPL मध्ये 5 वा विजय आहे. अशा प्रकारे, संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा टिकून आहे. 12 सामन्यांमध्ये संघाचे 10 गुण आहेत आणि ते 7 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर आहेत.तर दुसरी कडे सीएसकेची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.
CSK च्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने वेगवान सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेट्ससाठी 5.2 षटकांत तब्बल 77 धावा केल्या . मात्र शार्दूल ठाकूरच्या बॉलवर लुईसला तंबूत परतावं लागलं . लुईसने आपल्या 12 चेंडूच्या खेळीत 27 धावा केल्या . ज्यात त्याने सणसणीत 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
पहिल्या 6 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 81 झाली. यशस्वीने अवघ्या 19 चेंडूत आपले तुफानी अर्धशतक पूर्ण केले. 21 चेंडूत 50 धावा केल्यावर तो बाद झाला. त्याचे टी -20 कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावत CSK च्या गोलंदाजांना अक्षरश सळो की पळो करून सोडलं.
81 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि शिवम दुबेने तिसऱ्या विकेटसाठी 89 धावा जोडल्या आणि संघाचा विजय निश्चित केला. सॅमसनला शार्दुलने बाद केले. शिवमला दुसऱ्या लेगच्या सामन्यात पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने अर्धशतक झळकावून स्वत: ला सिद्ध केले. त्याने 42 चेंडूंचा सामना केला. 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. ग्लेन फिलिप्सही 14 धावांवर नाबाद राहिला.आणि RR च्या साऱ्या फलंदाजांनी हा विजयरथ खेचून आणला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.