राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) विश्वास आहे की त्यांचा संघ आयपीएल 2021च्या (IPL 2021) प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल. Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत राजस्थान समोर 'रॉयल्स चॅलेंज'

कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांना एकत्र केले. आमचे लक्ष्य निश्चितच चॅम्पियनशिपकडे (Championship) आहे. पण आम्ही आमच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत आहोत.

दैनिक गोमन्तक

IPL 2021: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) विश्वास आहे की त्यांचा संघ आयपीएल 2021च्या (IPL 2021) प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल. आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या टप्प्यात, राजस्थान रॉयल्स 21 सप्टेंबरला पंजाब किंग्जविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्याने सुरुवात करणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 7 पैकी 3 सामन्यांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्याबाबत कर्णधार सॅमसन खूप सकारात्मक आहे.

तो म्हणाला, “गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. सकारात्मक दृष्टीकोनातून ठेवणे महत्त्वाचे आहे. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर निवडीबद्दल शंका राहणार नाही. ”

टीम इंडियामधील निवडीबद्दल सॅमसन म्हणाला, "सर्वप्रथम, जर तुम्ही आयपीएल संघासाठी खेळत असाल आणि भारतीय संघात निवडीचा विचार करत असाल तर ती चुकीची मानसिकता आहे. लोक भारतीय निवडीबद्दल बरेच बोलतात परंतु प्रत्यक्षात तुम्ही जर चांगली कामगिरी केलीत तर तुम्हाला संधी मिळेलच.

बुधवारी सराव सत्र सुरू करण्यापूर्वी, कर्णधार संजू सॅमसनने आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांना एकत्र केले. आमचे लक्ष्य निश्चितच चॅम्पियनशिपकडे आहे. पण आम्ही आमच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत आहोत. एकावेळी एका सामन्याबद्दल विचार करत आहोत. आम्हाला सर्व काही द्यावे लागेल, आम्ही पुन्हा 8 व्या क्रमांकावर राहिलो तर मला हरकत नाही, परंतु तुम्ही सर्व लोकांनी तुमचे 100 टक्के द्यावे अशी माझी इच्छा आहे, मग कोणताही संघ विरोधात असला तरी चालेल.

जर राजस्थान रॉयल्सला प्लेऑफसाठी पात्र व्हायचे असेल, तर त्यांचा कर्णधार संजू सॅमसनला आयपीएल 2021 च्या स्टेज 2 मध्ये आपला चांगला फॉर्म कायम राखणे आवश्यक आहे. ते बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर सारखे स्टार खेळाडू खेळणार नसल्याने त्यांचा मार्ग काहीसा खडतर आहे. राजस्थानसाठी आनंदाची बातमी म्हणजे एव्हीन लुईस सीपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिस पूर्वार्धात अव्वल फॉर्ममध्ये होता आणि पुढेही त्याचा फॉर्म तसाच राहील अशी आशा राजस्थानला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली, पण संघाला मॅच विनरची गरज आहे. कारण पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये, सॅमसनने कर्णधार पाळी खेळत संघाला विजयाकडे नेले. पण इतर खेळाडू फारसे छाप सोडू शकले नाहीत. युएईमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात अगोदर संघाला अनेक मोठे धक्के बसले आहेत. संघाचे अनेक स्टार खेळाडू या अर्ध्यामध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे संघ कमकुवत दिसत आहे, उत्तरार्धात ते 7 सामने खेळणार आहे, त्यापैकी 5 जिंकणे आवश्यक आहे, जे थोडे कठीण दिसते.

आयपीएल 2021 पहिला टप्पा (राजस्थान रॉयल्सची कामगिरी)

सामने - 7

विजय - 3

पराभव - 4

रनरेट - 0.190

उर्वरित सामने - 7

प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी 5 सामने जिंकणे आवश्यक आहे

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने पहिल्या सहामाहीत 7 पैकी तीन सामने जिंकले आहेत. संघाचा रन रेट -0.190 आहे. राजस्थानचे 6 गुण आहेत, त्यांना प्ले ऑफमध्ये पात्र होण्यासाठी आणखी 10 ची आवश्यकता आहे. आता संघाकडे आणखी 7 सामने खेळायचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT