न्यूझीलंड संघाने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. न्यूझीलंड संघ (New Zealand Cricket Team) 18 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता जिथे त्यांना तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळायची होती, परंतु किवी संघाने पहिला एकदिवसीय सामना सुरु होण्यापूर्वी दौरा रद्द केला. सुरक्षेचे कारण पुढे करत हा दौरा रद्द केला असल्याचे सांगितले. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, आमच्या देशाच्या सरकारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करत आहे. परंतु दुसरीकडे पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंना याचा निषेध केला. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातही पाकिस्तानची जोरदार धडक होती. अशा स्थितीत युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने (Chris Gayle) पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.
न्यूझीलंडच्या हालचालीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) न्यूझीलंडला आयसीसीकडे खेचण्याची धमकी दिली. त्याचवेळी पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली असल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत गेलने आपल्या एका ट्वीटद्वारे या देशाचे समर्थन केले आहे. गेलने ट्विट केले, "मी उद्या पाकिस्तानला जात आहे. कोण येत आहे माझ्याबरोबर? " गेल सध्या यूएईमध्ये आहे जेथे तो आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात पंजाब किंग्जकडून खेळणार आहे.
मोहम्मद आमिर केले स्वागत
गेलच्या या ट्विटवर अनेक जणांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. गेलचे हे ट्विट पीसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे रिट्विट करण्यात आले आहे. ज्यांनी या ट्विटला प्रतिसाद दिला त्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरचेही नाव समाविष्ट आहे. गेलच्या ट्वीटवर टिप्पणी करताना अमीरने लिहिले, "पाहा लीजेंड." हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे.
सॅमीनेही पाठिंबा दिला
गेल हा एकमेव क्रिकेटपटू नाही ज्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यांच्याच देशाचे माजी कर्णधार डॅरेन सॅमी यांनीही पाकिस्तानच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने दोन वेळा टी -20 विश्वचषक जिंकला आहे. गेलप्रमाणे तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, त्यांनी गेल्या सहा वर्षांत अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली परंतु आम्हाला सुरक्षेचा कोणताही धोका जाणवला नाही. सॅमीने लिहिले, "सकाळी उठल्याबरोबर, पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानची मालिका सुरक्षेमुळे रद्द झाल्याची निराशाजनक बातमी ऐकली. मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. "
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.