Chris Morris
Chris Morris Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: ख्रिस मॉरिसचा आपल्याच संघांला 'रॉयल' दणका

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या 43 व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. मात्र राजस्थानला (Rajasthan Royals) उत्तम कामगिरी करण्यामध्ये यश आले होते. परंतु 10 षटकांनंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आणि बघता-बघता राजस्थानच्या फलंदाजांनी घुडगेही टाकले. अन् राजस्थानला केवळ 149 धावाच उभारण्यात यश आले. दुसरीकडे राजस्थानने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने वेगाने सुरुवात करत सात गडी राखून सामना जिंकला. राजस्थानच्या नामुष्कीस वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस (Chris Morris) सर्वस्वी जबाबदार ठरला असल्याचे सामन्यानंतर पुढे आले. मॉरिसने 50 धावा दिल्या मात्र विकेट काढण्यात अपयश आले.

राजस्थान रॉयल्सचे डायरेक्टर कुमार संगकारा (Kumar Sangakkara) मॉरिसच्या कामगिरीने निराश झाला. तो यावेळी म्हणाला की, मॉरिसला माहिती आहे की, त्याने आपल्या संघाला निराश केले आहे. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात मॉरिसला आतापर्यंत एकही विकेट मिळवता आलेली नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये मॉरिसला चांगली कामगिरी करता आली नसल्याचे सिद्ध झाले आहे. संगकाराने पुढे म्हटले की, संघांच्या पराभवासाठी संघातील केवळ एकच खेळाडू जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. पराभव आणि विजय हा खेळाचा भाग आहे.

यूएईमध्ये विकेटचे खाते अद्याप उघडण्यात अपयश

संगकाराने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, "आम्ही आमच्या संघावर आरोप- प्रत्यारोप करु शकता नाही. खेळामध्ये आपण कधी जिंकतो तर कधी हारतो. आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नाही, ते सर्वांना माहित आहे. आम्ही काही गोष्टी साध्या सरळ ठेवून जास्तीत- जास्त सरावावर भर देत आहोत. विरुध्द संघांच्या विरोधात बनवलेली रणनीती अंमलात आणण्याचा प्रयत्न तेवढा बाकी आहे.

आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात ख्रिस मॉरिसने चमकदार कामगिरी केली. संगकारा सामन्यानंतरच्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला, "मॉरिस काही प्रमाणात आमच्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. पुढील सामन्यांमध्ये विरोधी संघाविरुद्ध खेळण्यासाठी सर्वोत्तम खेळाडू बनू शकतो.

चहल आणि शाहबाज यांची शानदार गोलंदाजी

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) या फिरकी जोडीच्या दमदार कामगिरीवर आरसीबीने राजस्थानला हरवून तिसरे स्थान कायम राखले आहे. मॅक्सवेलने 30 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. त्याने श्रीकर भारत (35 चेंडूत 44) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली.

मॉरिसला मोठ्या रकमेसाठी खरेदी केले गेले

राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटींची बोली लावून ख्रिस मॉरिसला आपल्या संघात समाविष्ट केले. परंतु यूएईमध्ये आतापर्यंत त्याने त्याला जेवढी बोली लागली तेवढ्या प्रमाणात न्याय देण्यात अपयश आले. या हंगामात ख्रिस मॉरिसची कामगिरी पाहिली तर त्याने आयपीएल 2021 च्या 10 सामन्यांमध्ये 67 धावा आणि 14 विकेट्स मिळवल्या आहेत. परंतु बुधवारी झालेल्या सामन्यात तो खूप महाग ठरला. आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT