नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर(Corona 2nd wave) स्थगित झालेला यंदाचा बहूचर्चित आयपीएल(IPL) हंगाम पुन्हा दुबईमध्ये होणार आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची आभासी विशेष सर्वसाधारण सभा आज (SGM) शनिवारी मुंबईत पार पडली. यामध्ये आयपीएल-14 च्या उर्वरित सामन्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. युएई, अबूधाबी, दुबई आणि शारजाह येथिल तीन ठिकाणी आयपीएल-14 चे उर्वरित सामने सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार आहेत.(IPL 2021 BCCI big decision 31 matches to be held in UAE)
आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा आता युएईमध्ये होणार आहे. शनिवारी बीसीसीआयच्या एसजीएममध्ये हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल 2021 कोरोनामुळे 4 मे रोजी निलंबित करण्यात आले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली.
आयपीएलच्या पहिल्या लीगमध्ये 29 सामने खेळले गेले. उर्वरित 31 सामने आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळले जातील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खराब हवामानाचा अंदाज घेऊन बीसीसीआयने टी -20 लीग युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने 19 किंवा 20 सप्टेंबर दरम्यान होणार असून अंतिम सामना युएईमध्ये 10 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.
आयपीएलमधील 6 खेळाडू, 2 सपोर्ट स्टाफ आणि एक बस क्लीनर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मधेच थांबावे लागले. ही टी 20 लीग सलग दुसर्या वर्षी युएईमध्ये होणार आहे. मागील वर्षीदेखील आयपीएल कोरोनामुळे युएईमध्येच खेळवली गेली होती. इंग्लिश काऊन्टी संघांनी इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वर्षाच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.