अबुधाबी: कोलकताचा संघ कितीही ताकदवर असो, पण त्यांच्याविरुद्ध नेहमीच यशस्वी ठरणाऱ्या मुंबई इंडियन्सने ही परंपरा कायम राखली आणि आयपीएलच्या १३ व्या हंगामात विजयाचा श्रीगणेशा केला. ४९ धावांनी विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने निर्णायक ८० धावांची खेळी केली.
कोलकताविरुद्ध मुंबईने आजच्या सामन्यापूर्वी १० पैकी नऊ लढती जिंकल्या आहेत. आजही सहज वर्चस्व प्रस्तापित केले. रोहितच्या शानदार खेळीमुळे १९५ धावा करणाऱ्या मुंबईने कोलकता संघाला १४६ धावांवर रोखले. अमिरातीमधील मुंबईचा हा पहिला विजय ठरला.
मुंबईने पहिल्यापासून त्यांच्या डावावर वर्चस्व मिळवले. गिल आणि नारायण ही सलामीची जोडी झटपट बाद केली त्यानंतर भले दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांना डाव सावरला, परंतु आवश्यक धावांचा बोजा वाढत गेला. त्यातच ते बाद झाले.
मुंबईला भिती होती ती आंद्रे रसेल आणि मॉर्गन यांच्याकडून परंतु बुमारने आपल्या एकाच षटकात या दोघांना बाद करुन मुंबईचा विजय निश्चित केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला सुरवातीला धक्का बसला डिकॉक बाद झाला, परंतु कर्णधार रोहितला चांगला सूर सापडला. कोलकता संघाविरुद्ध रोहितचे बॅट हमखास तळपते आजही ती बहरली. १४८ च्या स्ट्राईक रेटने त्याने ५४ चेंडूत ८० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई २० षटकांत ५ बाद १९५ (रोहित शर्मा ८० -५४ चेंडू, ३ चौकार, ६ षटकार, सूर्यकुमार यादव ४७ - २८ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, सौरव तिवारी २१ -१३ चेंडू, १ चौकार, १ षटकार, हार्दिक पंड्या १८ -१३ चेंडू, २ चौकार, १ षटकार, शिवम मावी ३२-२, आंद्रे रसेल १७-१) वि. वि. कोलकता ः २० षटकांत २० षटकांत ९ बाद १४६ (दिनेश कार्तिक ३० -२३ चेंडू, ५ चौकार, नितिश राणा २४ -१८ चेंडू, २ चौकार, १ षटकार, मॉर्नग १६, रसेल ११, कमिन्स ३३ -१२ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, बोल्ट ३०-२, पॅटिन्सन२६-२, बुमरा ३२-२, राहुल चहर २६-२)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.