Injury time goals to help time Churchill Brothers 1 2
Injury time goals to help time Churchill Brothers 1 2 
क्रीडा

वेळसावच्या मदतीस इंज्युरी टाईम गोल; चर्चिल ब्रदर्सला 2-2 गोलबरोबरीत रोखून एका गुणाची कमाई

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईम खेळातील पाचव्या मिनिटास गोल नोंदवत वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सला 2-2 गोलबरोबरीत रोखून एका गुणाची कमाई केली. सामना मंगळवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

रोनिल आझावेदो याने 95व्या मिनिटास केलेला गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला विजयाच्या पूर्ण तीन गुणांस मुकावे लागले. त्यापूर्वी पेनल्टी फटक्यावर ब्रायन मस्कारेन्हास याने वेळसाव क्लबला आघाडी मिळवून दिली होती. ज्योबर्न कार्दोझ याच्या दोन गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने नंतर आघाडी प्राप्त केली. चर्चिल ब्रदर्सची ही दहा लढतीतील दुसरी बरोबरी ठरली. त्यांचे आता 14 गुण झाले आहेत. वेळसाव क्लबने दहाव्या लढतीत दुसरी बरोबरी नोंदवत गुणसंख्या आठवर नेली. ते आता नवव्या स्थानी आले आहेत. (Injury time goals to help time Churchill Brothers 1 2)

सामन्याच्या 18व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्स संघाने पिछाडी पत्करली. त्यांच्या असिफ अली मोल्ला याने वेळसावच्या जोसेफ परेरा याला पेनल्टी क्षेत्रात पा़डले. त्यानंतर स्पॉट किकवर ब्रायन मस्कारेन्हासने अचूक फटका मारताना चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक देबनाथ मंडल याचा बचाव भेदला. विश्रांतीस तीन मिनिटे बाकी असताना वेळसाव क्लबचा प्रेस्ली मस्कारेन्हास याला चर्चिल ब्रदर्सच्या शुबर्ट परेरा याचा फटका रोखता आला नाही, त्याचा लाभ उठवत ज्योबर्नने बरोबरीचा गोल केला. पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते.

उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर 52व्या मिनिटास ज्योबर्नने आणखी एक गोल करून चर्चिल ब्रदर्सला 2-1 आघाडी मिळवून दिली. यावेळी किंग्सली फर्नांडिसने चाल रचली, नंतर शुबर्ट परेराने चेंडूसह मैदानाच्या डाव्या बाजूतून मुसंडी मारली आणि ज्योबर्नला गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना ब्रायन मस्कारेन्हासच्या असिस्टवर पियुष सिकारवार याला चेंडूला योग्य दिशा दाखविता आली नाही, त्यामुळे वेळसाव क्लबला बरोबरी साधता आली नाही. अखेरीस सामन्याच्या शेवटच्या मिनिटास रोनिल आझावेदो याने चर्चिल ब्रदर्सची आघाडी भेदणारा बरोबरीचा गोल केला.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT