विराट कोहली आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता मौन सोडले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

INDvsEND: 'हा तर निवड समितीचा निर्णय',वादावर सौरव गांगुली यांची प्रतिक्रिया

पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला न पाठविल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे.

Sanket Kulkarni

शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंड दौऱ्यावर (tour to England) पाठविण्यास निवडसमितीने नकार दिल्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma chairman of the selection committee) यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे. मात्र या सर्व विषयावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी आता मौन सोडले आहे. (INDvsEND: 'This is the decision of the selection committee', Sourav Ganguly reaction to the controversy)

याबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले, हा निवड समितीचा निर्णय आहे. यावर मी बोलू शकत नाही, पण जास्त काही होणार नाही आम्ही सगळे संभाळून घेऊ. तसेच इंग्लंडच्या कसोटी मालिकेनंतर उर्वरीत आयपीएलचे युएईत नियोजन करण्यात आले आहे. ते यशस्वी करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. असे गांगुली यांनी म्हणले आहे.

शुभमन गिल जायबंदी झाल्यावर त्याच्याजागी पृथ्वी शॉ किंवा देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठविण्याची विनंती संघाचे मॅनेजर गिरीश डोंग्रे यांनी केली होती. पण संघ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी पाठविलेल्या उत्तरात म्हणले आहे की, संघात आता चार सलामी फलंदाज आहेत. त्यावरुन कर्णधार विराट कोहली आणि चेतन शर्मा यांच्यात वाद झाला असल्याचे समोर आहे.

चेतन शर्मा यांच्या म्हण्यानुसार भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आहे. जो सलामीवीर आहे. पण त्याच्यावर कर्णधार कोहलीला विश्वास नाही. त्यामुळे त्याने आपल्या पसंतीचे खेळाडू पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठविण्यास सांगितले पण ते निवडसमितीने याला नकार दिल्यावर चेतन शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वादावादी झाली असल्याचे समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT