Ind vs Nz T20 Series Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs Nz T-20: न्युझीलंडविरूद्ध आज पहिली टी-20 लढत; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रक्षेपण

भारताची युवा खेळाडूंवर धुरा; सूर्यकुमार यादवला विक्रमाची संधी

Akshay Nirmale

Ind Vs Nz T-20: टी-20 वर्ल्डकपमधील सेमीफायलनमध्ये इंग्लंड विरोधात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या न्युझीलंड दौऱ्याला आजपासून सुरवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये आज, शुक्रवारी पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता सामन्यास सुरू होईल.

दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 लढती होणार आहेत. पैकी पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. दरम्यान, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरीजमधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे.

भारतीय निवड समितीने टी-20 वर्ल्डकपमधील भारतीय संघाची कामगिरी पाहून या दौऱ्यात युवा खेळाडुंना संधी दिली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्याकडे भारतीय संघाची कमान असणार आहे. कर्णधार पांड्यासमोर न्युझीलंडला त्यांच्यात घरात पराभूत करण्याचे आव्हान असणार आहे. यापुर्वी आयर्लंड दौऱ्यातही पांड्याला कर्णधार करण्यात आले होते. तिथे भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता पांड्याच्या संघाचा सामना केन विल्यमसन याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाशी असणार आहे.

वेलिंग्टनमध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तथापि, सामन्याच्या वेळेत हवामान स्वच्छ राहील, असे सांगण्यात येत आहे. थंड वाऱ्यांमुळे भारतीय खेळाडूंना अडचण होऊ शकते.

जवळपास 20 महिन्यानंतर वेलिंग्टनमध्ये टी-20 सामना होत आहे. येथे सरासरी स्कोर 162 राहिलेला आहे. तर 219 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदली गेली आहे. विशेष म्हणजे हा स्कोर न्यूझीलंडने भारताविरोधातच 2019 केला होता. येथे आत्तापर्यंत 15 सामने खेळले गेले आहेत आणि त्यातील 6 सामन्यात प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे टॉसचा परिणाम येथे फारसा पडणार नाही.

सूर्यकुमार यादव रिझवानचा विक्रम मोडणार

भारताचा मिस्टर 360 डीग्री सूर्यकुमार यादव याच्याकडे एका वर्षात टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविण्याची संधी आहे. सध्या पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यात आघाडीवर आहे. रिझवानने 2021 मध्ये 1326 धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमारने या वर्षात आत्तापर्यंत 1040 धावा केल्या आहेत.

निवड समितीने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे या संघात ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या हेच ज्येष्ठ खेळाडू आहेत. बाकी बहुतांश खेळाडू नवे आणि अनुभव नसलेले आहेत.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ

फिन एलन, डेवोन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डेरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, ईश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन

भारताचा संभाव्य संघ

ईशान किशन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, वाशिंगटन सुंदर, हर्षल पटेल/उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT