Deepak Chahar
Deepak Chahar Dainik Gomantak
क्रीडा

स्टेडिअममध्येच प्रपोज करणारा भारताचा 'तो ' गोलंदाज अडकणार लग्न बेडीत

दैनिक गोमन्तक

गतवर्षी आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत पार पडला होता. सात ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना पार पडला. यावेळी भारतीय स्टार खेळाडूने आपल्या प्रेयसीला भर मैदानात प्रपोज केले होते. याचा व्हिडीओ ही चांगलाच व्हायरल झाला होता. हा भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर लग्नाच्या बंधणात अडकणार आहे. एक जून रोजी दीपक चाहर आणि जया भारद्वाज लग्न करणार आहेत. (India's 'he' bowler proposing in the stadium will get married )

दीपक चाहरला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या मेगा ऑक्शन 2022 मध्ये तब्बल 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते. पण दीपक चाहर चेन्नईसाठी एकही सामना खेळू शकला नाही. त्याबरोबर आयपीएल सुरु होण्यापूर्वीच दीपक चाहर दुखापतग्रस्त झाल्याने तो संपूर्ण आयपीएलला मुकला आहे.

सात ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना पार पडला. सामना संपल्यानंतर दीपक चाहरने स्टेडिअममध्येच प्रेयसी जया भारद्वाज हिला लग्नासाठी प्रपोज केले होते. दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. यावेळी, आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली.

दीपक चाहरची होणारी पत्नी जया भारद्वाज ही दिल्लीस्थित बारहखंबा येथे राहणारी आहे. बिग बॉस-5 मध्ये सहभाग नोंदवलेल्या अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. ती एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहर बहिण मालती चाहरमार्फत जयाला भेटला होता. तेथूनच दोघांमध्ये प्रामाचे अंकूर फुटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT