Pat Cummins | Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाच्या खिलाडूवृत्तीने जिंकली मनं! 100 व्या कसोटीसाठी पुजाराला स्पेशल गिफ्ट

पुजाराला ऑस्ट्रेलियाकडून 100 व्या कसोटीनिमित्त खास भेट देण्यात आली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारतीय क्रिकेट संघाने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी 6 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडेच राखली आहे. पण या सामन्यातील पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाच्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून पुजाराला खास भेट

दिल्ली कसोटी ही भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराचा कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना होता. त्याचनिमित्ताने त्याला सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाची जर्सी त्याला भेट म्हणून दिली. या जर्सीवर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेल्या आहेत.

तसेच या जर्सीवर ऑस्ट्रेलिया संघाकडून खास संदेशही लिहिण्यात आला आहे. या जर्सीवर लिहिले आहे की 'शानदार लढतींबद्दल धन्यवाद.' कमिन्स पुजाराला ही जर्सी भेट देत असतानाचा फोटो बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, 100 व्या कसोटीनिमित्त जर्सी भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारतीय संघाकडून नॅथन लायनला त्याच्या १०० व्या कसोटीनिमित्त स्वाक्षरी केलेली जर्सी भेट देण्यात आली होती.

पुजाराने घेतली विजयी धाव

दरम्यान, दिल्ली कसोटीत विजयी धाव काढण्याची संधीही पुजाराला मिळाली. त्याने दुसऱ्या डावातील 27 व्या षटकात चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे 100 व्या कसोटीत विजयी धाव काढण्याचा मान मिळालेला तो रिकी पाँटिंगनंतरचा दुसराच खेळाडू ठरला.

पाँटिंगने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनीमध्ये 100 वा कसोटी सामना खेळताना ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव काढली होती. विशेष म्हणजे त्यानेही विजयी चौकार मारला होता.

गावसकरांकडून मिळाली स्पेशल कॅप

पुजाराला या सामन्यापूर्वी महान फलंदाज सुनील गावसकरांकडून 100 व्या कसोटीची स्पेशल कॅप प्रदान करण्यात आली होती. तसेच यावेळी त्याची पत्नी पुजा, मुलग आदिती आणि वडील अरविंद देखील उपस्थित होते.

पुजारा भारताकडून 100 कसोटी खेळणारा 13 वा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावसकर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (106), इशांत शर्मा (105), हरभजन सिंग (103), विरेंद्र सेहवाग (103) या भारतीय खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

SCROLL FOR NEXT