भारताचा (India) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) नव्या इंनिगला आता सुरुवात होणार आहे.

 
Dainik Gomantak
क्रीडा

मितालीकडून शार्दुल 'क्लिन बोल्ड',कुटुंबीयांच्या उपस्थित मुंबईत पार पडला साखरपुडा

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर लग्न करू शकतो, अशी बातमी समोर आली होती.

दैनिक गोमन्तक

भारताचा (India) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) नव्या इंनिगला आता सुरुवात होणार आहे. मुंबईच्या हा खेळाडूची त्याची मैत्रीण मिताली परुलकरसोबत (Mithali Parulkar) साखरपुडा पार पडला आहे. कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत झाला. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शार्दुलच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणीही या कार्यक्रमात सामील झाले की नाही हे स्पष्ट झालेले नाही. शार्दुल ठाकूर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर लग्न करू शकतो, अशी बातमी समोर आली होती.

30 वर्षीय शार्दुल सध्या टीम इंडियातून बाहेर असून तो ब्रेकवर आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. नुकताच T20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. अलीकडच्या काळात शार्दुल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे. कसोटीत त्याने बॅटनेही अद्भुत कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याने अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्याचे खूप कौतुक झाले.

शार्दुलची कारकीर्द

शार्दुल ठाकूर हा मूळचा मुंबईतील पालघर या उपनगरातला आहे. 2017 मध्ये त्याने टीम इंडियामध्ये पदार्पण केले. त्यानंतर, 2018 मध्ये त्याचे कसोटीत पदार्पण झाले. त्याने आतापर्यंत कसोटीत 14, एकदिवसीय सामन्यात 22 आणि टी-20मध्ये 31 बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी एकत्र खेळण्यास सुरुवात केली. दोघांनीही खेळातील बारकावे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून शिकून घेतले आहेत. शालेय जीवनात त्याने सहा चेंडूंत सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता.

पुढे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. मुंबईला रणजी चॅम्पियन बनवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आयपीएलमध्ये त्याचे पदार्पण पंजाब किंग्जकडून झाले. पण नंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये येऊन त्याने आपला जलवा दाखविला. 2018 आणि 2021 मधील चेन्नईच्या संघाचा तो भाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT