Women U19 WC 2023 | Indian Team
Women U19 WC 2023 | Indian Team  Dainik Gomantak
क्रीडा

Women U19 WC 2023: श्वेता, शेफाली यांचा दक्षिण आफ्रिकेला तडाखा; वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांची विजयी सुरूवात

Akshay Nirmale

Women U19 WC 2023: भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार शेफाली वर्मा आणि सलामीवीर श्वेता सेहरावत यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा केल्या होत्या. भारताने विजयाचे लक्ष्य 16.3 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.

(India beats South Africa)

कर्णधार शेफाली वर्माने श्वेता सेहरावतसोबत ७७ धावांची भागीदारी केली. अवघ्या 16 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने तिने 45 धावा ठोकल्या. तिच्या विकेटनंतर श्वेताने सूत्रे हाती घेतली. तिने फटकेबाजी करत धावगती कायम राखली.

शेफालीला अर्धशतक झळकावता आले नाही पण श्वेताने केवळ 37 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने अर्धशतक केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर श्वेताने आणखी आक्रमक होत अवघ्या 57 चेंडूत 92 धावांची नाबाद खेळी करत 9 चौकारांसह संघाला विजयाकडे नेले.

तत्पुर्वी सायमन लॉरेन्सच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावत 165 धावा केल्या होत्या. 44 चेंडूंचा सामना करताना लॉरेन्सने 9 चौकार आणि 1 षटकार मारत 61 धावांची खेळी केली.

मॅडिसन लॅड्समनने 17 चेंडूत 32 धावा केल्या. याशिवाय इतर बॅटरना विशेष योगदान देता आले नाही. भारताची कर्णधार शेफाली वर्माने 4 षटकात 31 धावा देत 2 बळी घेतले. सोनम यादव आणि परशवी चोप्रा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT