Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant Test Record: ऋषभ पंतने मोडला 69 वर्षे जुना विक्रम

एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे.

दैनिक गोमन्तक

Rishabh Pant Test Record: एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे. इथे पहिल्या डावात 146 धावा केल्यानंतर, दुसऱ्या डावात 16 धावा पूर्ण करताच, तो आशियाबाहेरील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला. त्याने विजय मांजरेकर यांचा 69 वर्षांपूर्वी केलेला 161 धावांचा विक्रम मोडला. (Indian Wicketkeeper Batsman Who Have Scored Most Runs In A Test Outside Asia Rishabh pant)

दरम्यान, भारताचा (India) पूर्व यष्टीरक्षक फलंदाज विजय मांजरेकर यांनी 1953 मध्ये किंग्स्टनमध्ये पहिल्या डावात 43 आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या होत्या. 69 वर्षांपासून कोणताही भारतीय यष्टीरक्षक हा विक्रम मोडू शकला नाही. गेल्या तीन वर्षांत पंत दोनदा या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता. 2011 मध्ये धोनीही या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता परंतु त्यालाही हा विक्रम मोडता आला नाही. मात्र, एजबॅस्टनमध्ये ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या दोन्ही डावांत शानदार फटकेबाजी करत ही कामगिरी केली. इथे ऋषभने पहिल्या डावातील शतकानंतर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. या कसोटीत त्याने 203 धावा केल्या.

आशियाबाहेर कसोटीत सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 5 यष्टिरक्षक फलंदाज

1. ऋषभ पंत: 203 धावा (146+57) एजबॅस्टन, 2022

2. विजय मांजरेकर: 161 धावा (43+118) किंग्स्टन, 1953

3. ऋषभ पंत: 159 धावा (159) सिडनी, 2019

4. एमएस धोनी: 151 धावा (77+74) एजबॅस्टन, 2011

5. ऋषभ पंत: 133 धावा (36+97) सिडनी, 2021

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT