Glan Martins Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: ग्लॅन मार्टिन्सवर एफसी गोवाचा पूर्ण विश्वास

एफसी गोवा (FC Goa) व्यवस्थापनाने पूर्ण विश्वास दाखविताना आणखी तीन वर्षांसाठी करार केला आहे. त्यामुळे तो 2024 पर्यंत या संघात असेल.

किशोर पेटकर

पणजी : गतमोसमाच्या मध्यास संघात दाखल झालेला मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स (Glan Martins) याच्यावर एफसी गोवा (FC Goa) व्यवस्थापनाने पूर्ण विश्वास दाखविताना आणखी तीन वर्षांसाठी करार केला आहे. त्यामुळे तो 2024 पर्यंत या संघात असेल.

एफसी गोवातर्फे इंडियन सुपर लीग (Indian Super League) (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय खेळ केल्यानंतर मार्टिन्सने या वर्षी जूनमध्ये भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. जानेवारीतील ट्रान्स्फर विंडोत एटीके मोहन बागान संघातून मार्टिन्स एफसी गोवा संघात दाखल झाला, त्यानंतर त्याने गोव्यातील संघातील स्थान शानदार कामगिरीने भक्कम केले.

सेंट्रल-मिडफिल्ड जागी खेळणाऱ्या वेळसाव येथील 27 वर्षीय मार्टिन्सने एफसी गोवातर्फे फेब्रुवारीत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध वास्को येथे आयएसएल पदार्पण केले, तेव्हापासून तो संघाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या विश्वासास पात्र ठरला.

प्रमुख खेळाडू

एफसी गोवातर्फे मार्टिन्स 2020-21 मोसमात 14 सामने खेळला, त्यापैकी 12 लढतीत त्याने स्टार्ट मिळविला. एप्रिलमध्ये झालेल्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील सहापैकी पाच सामन्यांत तो सुरवातीपासून खेळला. चिकाटी व उत्साहाने खेळत ग्लॅनने एफसी गोवा संघातील जागा भक्कम केली. ग्लॅनच्या नव्या कराराबद्दल प्रशिक्षक फेरांडो यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच्याविषयी प्रशिक्षकांनी सांगितले, की ``पहिल्यांदा तो सरावासाठी आला, तेव्हा तो खूपच भुकेल्यासारखा भासला. त्याला खेळायचे होते, सहभागी व्हायचे होते. त्याला मैदानावर उतरून बदल घडवायचा होता. या वृत्तीस मी महत्त्व देतो. आमच्या संघात सुधारणा घडविणारा तो खराखुरा व्यावसायिक आहे.``

रोमांचक अनुभव

एफसी गोवा क्लबबरोबर तीन वर्षांचा करार हा मला व कुटुंबीयांसाठी खरोखरच रोमांचक अनुभव आहे,`` असे मार्टिन्सने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. मैदानावर, तसेच मैदानाबाहेर अल्पावधीत क्लबतर्फे आपल्याला भरपूर प्रगती साधता आली. त्यामुळे अपेक्षांची अधिक जाणीव झाली आहे, असेही त्याने नमूद केले. एफसी गोवातर्फे पुन्हा एकदा चँपियन्स लीग स्पर्धेत खेळण्याची, केवळ संघासाठी आणि आपल्यासाठी नव्हे, तर गोमंतकीयांसाठी करंडक जिंकण्याची मनीषा मार्टिन्स व्यक्त केली.

एफसी गोवातर्फे ग्लॅन मार्टिन्स

- 14 सामने, 1 गोल, 1 असिस्ट

- आयएसएल स्पर्धेत 8 सामने (7 लढतीत स्टार्ट)

- एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत 6 सामने (5 लढतीत स्टार्ट)

- आयएसएल स्पर्धेती गोल विरुद्ध मुंबई सिटी एफसी (8 फेब्रुवारी 2021, बांबोळी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT