Akanksha Khamkar and Kaveri khamkar

 

Dainik Gomantak

क्रीडा

नाशिकच्या 'धाक्कड गर्ल्सची' पहिल्या 'राष्ट्रीय ग्रेपलिंग रेसलिंग' स्पर्धेत उत्तम कामगिरी

नाशिकमधील सिन्नर येथील दोन सख्ख्या बहिणींनी 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' ('Indian Open Grappling Wrestling Championship-2021) मध्ये अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळवले आहे.

दैनिक गोमन्तक

नाशिक: आजवर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कमालीची कामगिरी केली आहे. शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आणि संपूर्ण देशाने याची दखलही घेतली आहे. यातच आता नाशिकमधील दोन बहीणींनी उज्ज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे नाव उंच केले आहे.

नाशिकमधील सिन्नर येथील दोन सख्ख्या बहिणींनी 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' ('Indian Open Grappling Wrestling Championship-2021) मध्ये अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळवले आहे. आकांक्षा कृष्णाजी खामकर आणि कावेरी कृष्णाजी खामकर अशी या दोघी बहिणींची नावे आहेत.

आकांक्षा हिने 72 किलो वजनी गटात सुवर्ण पदक (Gold Medal) आणि चांदीची गदा (Silver mace) पटकावत 'भारत ग्रेपलर श्री' हा मान मिळवला, तर धाकटी बहीण कावेरी हिने देखील 62 किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver Medal) मिळवले आहे.

आपल्या देशातील असंख्य क्रीडा प्रेमींकडून या दोघींचेही कौतुक होत आहे. पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंवार मत करत आकांक्षाने सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर कावेरीनेही रौप्यपदक मिळवून उत्कृष्ट कामगिरी गेली आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT