Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

Ajinkya Rahane: रहाणेचा मोठा निर्णय! विंडिजविरुद्ध परत येताच 'या' संघाची सोडली साथ

Ajinkya Rahane: वेस्ट इंडिजविरुद्ध परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून विश्रांतीचा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane withdraw from his stint with county club Leicestershire:

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यातून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतात परतला आहे. त्यानंतर लगेचच त्याने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने इंग्लंडमधील काउंटी क्लब लिसेस्टरशायर संघाकडून चालू हंगामात खेळण्यास नकार दिला आहे.

रहाणेने भारतीय कसोटी संघात जून महिन्यात पुनरागमन करण्यापूर्वी लिसेस्टरशायरकडून खेळण्यासाठी करार केला होता. त्यामुळे तो ऑगस्टमध्ये लिसेस्टरशायरकडून वनडे कप खेळण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र, त्याने आता माघार घेतली आहे. क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारताला पुढील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबर-जानेवारी दरम्यान खेळायची आहे. त्यामुळे आता त्यावेळी रहाणे पुन्हा भारताकडून खेळताना दिसू शकतो.

तथापि, पीटर हंँड्सकॉम्बने रहाणेचा बदली खेळाडू म्हणून लिसेस्टरशायरबरोबरील करार वाढवला आहे. त्याने या संघाकडून टी20 ब्लास्टर स्पर्धा आणि काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धा खेळली आहे.

लिसेस्टरशायरने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली आहे की रहाणेने त्याच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेमुळे त्याच्या काउंटीबरोबरील करारात बदल झाला आहे. त्याने आता ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लिसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लाउड हेंडरसन यांनी सांगितले की 'आम्ही अजिंक्य रहाणेची परिस्थितीत समजू शकतो. त्याच्यासाठी गेले काही महिने व्सस्त राहिले आहेत. आम्ही त्याची तंदुरुस्त होण्याची आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी वेळ हवा असल्याची त्याची विनंती स्विकारत आहोत.'

'आम्ही अजिंक्य रहाणेबरोबर सातत्याने संपर्कात असून क्रिकेटमध्ये परिस्थितीत झटक्यात बदलू शकते, हे स्विकारतो. आम्ही समजून घेतल्याबद्दल रहाणे कृतज्ञ आहे आणि त्याने एक दिवस लिसेस्टरशायरबरोबर खेळण्याची आशाही बाळगली आहे.'

रहाणेने जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून जवळपास 18 महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्या सामन्यात त्याने 89 आणि 46 धावांची खेळी केली होती.

पण नंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला खास काही करता आले नव्हते. त्याने खेळलेल्या या दोन्ही सामन्यात दोन डावात फलंदाजी करताना 3 आणि 8 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT