Women's T20 World Cup: महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या पराभवानंतरही त्यांना उपांत्य फेरी गाठण्याचा फायदा झाला.
आता पुढचा T20 विश्वचषक बांगलादेशमध्ये 2024 मध्ये खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारत आधीच पात्र ठरला आहे. भारतीय संघाने आता या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारताशिवाय इतर सात संघही या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
आयसीसीने (ICC) मंगळवारी पुष्टी केली की, आठ संघांनी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता दर्शविली आहे. पात्रता प्रक्रियेनुसार, नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी -20 विश्वचषकात गटातील पहिले तीन संघ या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड (New Zealand) आणि दक्षिण आफ्रिका, तर ग्रुप 2 मधील इंग्लंड, भारत आणि वेस्ट इंडीजमधील संघाने पुढील टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता दर्शविली आहे.
तसेच, विश्वचषकाचे यजमानपद भूषवणारा बांगलादेश यजमान म्हणून पात्र ठरला आहे, तर पाकिस्तानने 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत ICC महिला T20 संघ क्रमवारीत पुढील सर्वोच्च क्रमांकाचा संघ म्हणून स्थान मिळवले आहे. एकूण आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
उर्वरित दोन संघ ग्लोबल क्वालिफायरद्वारे पात्र ठरतील. या वर्षीच्या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांपैकी श्रीलंका आणि आयर्लंड हे एकमेव संघ आहेत जे थेट पात्र ठरु शकले नाहीत. श्रीलंका सध्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे, तर आयर्लंड दहाव्या स्थानावर आहे. त्याचवेळी या दोन्ही संघांनी विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.