Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs PAK: हिट मॅनचा पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त प्लॅन, सामन्यापूर्वी केला खुलासा

दैनिक गोमन्तक

India vs Pakistan T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 चा बिगुल वाजला आहे. तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाचा प्लॅन सांगितला आहे. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे

रोहित शर्माने (Rohit Sharma) 'BCCI.TV' वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'खेळाडूंनी सामन्यादरम्यान स्वत:ला शांत आणि संयमी ठेवले, तर आम्हाला हवे तसे निकाल मिळतील. भारताला विश्वचषक जिंकून बरेच दिवस झाले आहेत. भारताने (India) शेवटचा विश्वचषक जिंकून 11 वर्षे झाली आहेत.' कर्णधार रोहित शर्माला हे चांगलेच ठाऊक आहे की, आपल्या संघाला विजेतेपद मिळवण्यासाठी योग्य मार्गाने बर्‍याच गोष्टी कराव्या लागतील. भारतीय संघाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयसीसीमध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते.

उपांत्य फेरीचा विचार नाही

रोहित पुढे म्हणाला की, ''विश्वचषक जिंकणे हे आमचे ध्येय आहे, परंतु आम्हाला हे देखील माहित आहे की, तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला बर्‍याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एका वेळी एक गोष्ट करणे आणि आम्ही ज्या संघाविरुद्ध लढू त्या प्रत्येक संघावर लक्ष केंद्रित करणे, यास प्राधान्य असेल. उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीचा विचार न करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल.''

कर्णधार म्हणून पहिलीच स्पर्धा

T20 विश्वचषक ही कर्णधार म्हणून रोहितची पहिली ICC स्पर्धा आहे. 12 महिन्यांपूर्वी गेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली संघाचा समावेश होता. रोहित पुढे म्हणाला की, 'संघाचा कर्णधार होणे हा मोठा सन्मान आहे. कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच विश्वचषक आहे, त्यामुळे मी याबद्दल खूप उत्सुक आहे. इथे येऊन काहीतरी खास करण्याची ही एक उत्तम संधी आहे.'

ऑस्ट्रेलियासमोर वेगळे आव्हान असेल

रोहित पुढे असेही म्हणाला की, 'जेव्हाही तुम्ही विश्वचषकासाठी येता, तेव्हा एक अद्भुत अनुभूती येते. पर्थमधील सराव शिबिर छान होते. आम्ही नुकत्याच घरच्या भूमीवर दोन मालिका जिंकल्या, पण ऑस्ट्रेलियात आव्हान खूपच वेगळे असेल. परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे.'

पाकिस्तानविरुद्ध योजना सांगितली

भारत 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) मोहिमेला सुरुवात करेल. रोहीत शेवटी म्हणाला की, 'सुरुवातीला हा मोठा सामना आहे, पण आम्ही 'रिलॅक्स' होऊ आणि खेळाडू म्हणून काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करु. हे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT