Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कांगारुंचा धुव्वा उडवत टीम इंडियाने मालिका घातली खिश्यात, शॉन ॲबॉटची खेळी व्यर्थ

Manish Jadhav

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते.

पावसामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तासाभराहून अधिक काळ खेळ थांबला होता. भारताने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

भारताकडून शुभमन गिल (97 चेंडूत 104, सहा चौकार, चार षटकार) आणि श्रेयस अय्यर (90 चेंडूत 105 धावा, 11 चौकार, 3 षटकार) यांनी शतके झळकावली. सूर्यकुमार यादव 72 धावा करुन नाबाद राहिला.

त्याने 37 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि तब्बल 6 षटकार मारले. तर कर्णधार केएल राहुलने (38 चेंडूत 52 धावा, तीन चौकार, तीन षटकार) अर्धशतक झळकावले.

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने (Australia) निराशाजनक सुरुवात केली. प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या षटकात मॅथ्यू शॉर्ट (9) आणि स्टीव्ह स्मिथ (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 9 व्या षटकानंतर थांबवावा लागला. तासाभराहून अधिक काळ खेळ थांबवण्यात आला, त्यामुळे षटके कमी झाली. वॉर्नरने तिसर्‍या विकेटसाठी मार्नस लॅबुशेन (27) सोबत 80 धावांची भागीदारी केली.

मात्र, ही भागीदारी अश्विनने 13व्या षटकात मोडली, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडू लागल्या. अश्विनने 15 व्या षटकात वॉर्नर आणि जोश इंग्लिस (6) यांना बाद केले.

अॅलेक्स कॅरी (14) 19व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर तर 20व्या षटकात कॅमेरुन ग्रीन (19) धावबाद झाला. आठव्या क्रमांकावर आलेल्या अॅबॉटने आक्रमक फलंदाजी केली. शेवटचा खेळाडू म्हणून तो शमीच्या जाळ्यात अडकला. जोश हेझलवूडने 23 धावांचे योगदान दिले.

गिल-अय्यरने झंझावाती शतके झळकावली

गिलने 97 चेंडूत चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या, तर अय्यरने 90 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 105 धावा केल्या.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली, जी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये कोणत्याही विकेटसाठी केलेली चौथी सर्वोच्च भागीदारी आहे. कर्णधार केएल राहुल (38 चेंडूत 52 धावा, तीन चौकार, तीन षटकार) आणि सूर्यकुमार यादव (37 चेंडूत नाबाद 72 धावा, सहा चौकार, सहा षटकार) यांनी अर्धशतकं झळकावून भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची (India) ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी, 2013 मध्ये भारताने बंगळुरुमध्ये सहा विकेट्सवर 383 धावा केल्या होत्या.

जोश हेझलवुड किफायतशीर गोलंदाज ठरला

ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरुन ग्रीन हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शॉन अॅबॉटने त्याच्या 10 च्या कोट्यात 91 धावा दिल्या, तर जोश हेझलवूड सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 62 धावा देत ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT