Team India X/BCCIWomen
क्रीडा

Video: हरमनप्रीतनेही राखली भारतीय कर्णधारांची परंपरा, तर ऐतिहासिक विजयानंतर टीमचा ड्रेसिंग रुममध्ये कल्ला

India Women vs England Women Test: इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाने कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जोरदार जल्लोष केला.

Pranali Kodre

India Women Cricket Team Celebration in Dressing Room after Historical Test Win against England Women Team:

डी वाय पाटील स्टेडियमवरभारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी (16 डिसेंबर) इंग्लंड महिला क्रिकेट संघाला नवी मुंबईत पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात तब्बल 347 धावांनी विजय मिळवला. भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक विजय ठरला.

भारतीय संघाने मिळवलेला हा विजय महिलाच्या कसोटी क्रिकेट इतिहासात धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय ठरला. या विजयानंतर भारतीय महिला संघाने जोरदार सेलिब्रेशन केले.

दरम्यान या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने विजेतेपदाची ट्रॉफी स्विकारली आणि नंतर ती या सामन्यातून कसोटी पदार्पण केलेल्या शुभा सतीश आणि जेमिमा रोड्रिग्स या युवा खेळाडूंकडे सोपवली. त्यानंतर या दोघींनी ती ट्रॉफी उंचावली. त्यानंतर भारतीय संघाने जल्लोष केला.

खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये अशी परंपरा पाहायला मिळाली आहे, ज्यावेळी मालिका जिंकल्यानंतर किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर त्या विजेतेपदाची ट्रॉफी कर्णधार संघातील एखाद्या युवा खेळाडूकडे सोपवली जाते. त्यामुळे संघातील युवा खेळाडू ती ट्रॉफी उंचावताना दिसतो. 

भारतीय संघाचा जल्लोष

दरम्यान, या सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही भारतीय संघाने कल्ला केला. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या दिप्ती शर्माने पार्टी द्यावी म्हणून भारतीय संघातील खेळाडू घोषणा देत आहेत. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजूमदार यांनी संघाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

भारताने जिंकला सामना

डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर दुसऱ्या डावात विजयासाठी 479 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 27.3 षटकात 131 धावांवर संपला. त्यामुळे भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात 104.4 षटकात पहिल्या डावात सर्वबाद 410 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 35.3 षटकातच 136 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने या डावात 292 धावांची आघाडी घेतली होती. दुसरा डाव भारताने 6 बाद 186 धावांवर घोषित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Protest: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

SCROLL FOR NEXT