India Wins Gold Medal Asian Games 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

India Wins Gold Medal Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या महिला कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले.

Manish Jadhav

India Wins Gold Medal Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या महिला कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करत देशासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले. संपूर्ण स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व गाजवत भारतीय महिलांनी अंतिम फेरीत इराणसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पुष्पाराणा हिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला, कारण एका क्षणी सामना बरोबरीत सुटल्यासारखा वाटत होता, परंतु भारतीय खेळाडूंनी केलेले उत्कृष्ट कमबॅक कौतुकास्पद ठरले.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय महिला कबड्डी संघाने सर्वोत्तम खेळ केला. पूल 'अ' मध्ये असलेल्या भारताने साखळी सामन्यांमध्ये बांगलादेश, जपान आणि इराण या सर्व संघांना लीलया पराभूत केले. यानंतर उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला नेपाळसोबत झाला, ज्यामध्ये भारताने 48-24 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.

अंतिम सामन्यात भारताची (India) गाठ पुन्हा एकदा इराणशी पडली. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये टीम इंडियाने संपूर्णपणे दबदबा राखत 22-16 अशी आघाडी घेतली. परंतु, दुसऱ्या हाफची सुरुवात होताच इराणने जोरदार पुनरागमन केले आणि धावसंख्या जवळपास बरोबरीत आणली. यामुळे सामना उलटणार असे वाटत होते, पण भारतीय महिलांनी शेवटच्या काही मिनिटांत खेळाची सूत्रे आपल्या हातात घेत सामना फिरवला. फुल टाईमपर्यंत भारताने 37-34 अशी आघाडी कायम राखत केवळ 3 गुणांच्या फरकाने सामना जिंकला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

विशेष म्हणजे, 2010 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय महिला संघाने यापूर्वी तीन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. 2022 मधील हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद कायम राखत भारताने 2026 मध्ये आपले चौथे सुवर्णपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 5 वेळा महिला कबड्डी स्पर्धा झाली असून, त्यात 4 वेळा भारताने तर एकदा इराणने सुवर्णपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेत इराणला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या नेपाळ आणि चायनीज ताइपे संघांना कांस्य पदक मिळाले. भारतीय महिलांच्या या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT