Vaibhav Suryavanshi India T20 squad Dainik Gomantaik
क्रीडा

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

India vs Zimbabwe T20 Series Match Timing: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.

Manish Jadhav

India vs Zimbabwe T20 Series Match Timing: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून, अनेक युवा खेळाडूंच्या समावेशामुळे भारतीय संघ पूर्णपणे नव्या रुपात मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, जर तुम्ही संध्याकाळी सात किंवा साडेसात वाजता सामना सुरु होण्याची वाट पाहत असाल, तर तुमच्याकडून सामना चुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सामन्याची अचूक वेळ आताच नोंदवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता सुरु होतील, तर सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 4:00 वाजता नाणेफेक (टॉस) होईल. त्यामुळे सर्व 20 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यास सामना संध्याकाळी साधारण आठ वाजेपर्यंत संपेल. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला असून खेळाडूंनी जोरदार सराव सुरु केला आहे. या मालिकेत युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. विशेषतः वैभव सूर्यवंशीला या तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती, त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याची ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे.

झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) खेळपट्ट्यांवर धावा काढणे सहसा सोपे नसते. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत एकाही सामन्यात दोनशेहून अधिक धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. मात्र, ते सामने बुलावायो येथे झाले होते, तर भारताचे सर्व सामने हरारे येथे खेळवले जाणार आहेत. त्यामुळे हरारेची खेळपट्टी फलंदाजांना साथ देते की गोलंदाजांना, हे 23 जुलैला पहिल्याच सामन्यात स्पष्ट होईल.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंह, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, रवी बिश्नोई.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT