Ravindra Jadeja  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI 1st ODI: जड्डूने मोडला कपिल देव यांचा 30 वर्ष जुना रेकॉर्ड, वेस्ट इंडिजविरुद्ध बनला सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

Ravindra Jadeja: पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, जडेजाने भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देवला मागे टाकून वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.

Manish Jadhav

IND vs WI 1st ODI: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने गुरुवारी इतिहास रचला. पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, जडेजाने भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देवला मागे टाकून वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी जडेजा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. भारताचा माजी स्टार फिरकीपटू अनिल कुंबळे याच्यासोबत 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 बळी घेऊन तो संयुक्तपणे तिसर्‍या स्थानावर होता. कपिल देव 43 विकेट्स घेऊन अव्वल स्थानावर आहेत.

दरम्यान, जडेजाने बार्बाडोस येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान 18व्या षटकात रोमॅरियो शेफर्डला बाद करुन भारताचे माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडला. वेस्ट इंडिजविरुद्ध रवींद्र जडेजाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.

विंडीजविरुद्ध त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीही केली आहे. याशिवाय, जडेजा कपिल देव (Kapil Dev) यांच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

मायदेशाबाहेर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 विकेट आणि 1000 धावा करणारा जडेजा हा पहिला अष्टपैलू खेळाडू बनणार आहे.

कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे. जडेजाने 1125 धावा केल्या आहेत, मात्र 50 विकेट पूर्ण करण्यासाठी त्याला तीन विकेट्सची गरज आहे.

दुसरीकडे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजचा डाव 114 धावांत गुंडाळला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर भारताकडून कुलदीप यादवने चार तर रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले.

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय

44- रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

43 - कपिल देव

41 - अनिल कुंबळे

37-मोहम्मद शमी

33 - हरभजन सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT