Team India
Team IndiaDainik Gomantak

WI vs IND, 1st ODI: संजू की इशान, कोणाला मिळणार संधी? सूर्यकुमारकडेही असेल लक्ष, पाहा संभाव्य Playing XI

वेस्ट इंडिजविरुद्ध 27 जुलैला होणाऱ्या पहिल्या वनडेसाठी कशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन, जाणून घ्या.
Published on

India's Probable Playing XI for 1st ODI against West Indies: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघाने नुकतीच कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. यानंतर आता या दोन संघातच 27 जुलैपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे होणार आहे.

ही वनडे मालिका आगामी आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जात आहे. त्याचमुळे पहिल्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Team India
WI vs IND, ODI: भारत-वेस्ट इंडिजमध्ये आता वनडे मालिकेचा थरार! केव्हा अन् कुठे पाहाणार मॅच, घ्या जाणून

दरम्यान, भारतीय संघव्यवस्थापसाठी सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे यष्टीरक्षक म्हणून कोणाला निवडायचे. यष्टीरक्षणासाठी सध्या इशान किशन आणि संजू सॅमसन असे दोन पर्याय आहेत.

इशान नुकताच कसोटी मालिकेत खेळला असून यात त्याची कामगिरीही चांगली झाली आहे. तसेच सॅमसनचाही फॉर्म चांगला राहिला आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाला संधी दिली जाणार हे पाहावे लागेल.

सूर्यकुमार यादवकडेही अनेकांचे लक्ष असेल. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. पण सूर्यकुमारची वनडे क्रिकेटमधील कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे या मालिकेदरम्यान लक्ष असणार आहे.

Team India
MS Dhoni: धोनीचा विंटेज अंदाज! 1980 रोल्स रॉयस कारमधून रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका; Video व्हायरल

याशिवाय भारताच्या फलंदाजी फळीत रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली हे कायम असतील. त्याचबरोबर रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या हे अनुक्रमे फिरकी आणि वेगवान गोलंदाजीत आपले योगदान देण्याबरोबरच फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.

तसेच जडेजाबरोबर फिरकी गोलंदाजीसाठी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचे पर्याय आहेत. दरम्यान, जडेजा आणि कुलदीप दोघेही डावखुरे असल्याचे लक्षात घेता कदाचीत चहला आधी प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच वेगवान गोलंदाजीमध्ये उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांना संधी दिली जाऊ शकते.

या वनडे मालिकेतील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

  • पहिल्या वनडेसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन/संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com