Mohammed Siraj flies back to India: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात नुकतीय कसोटी मालिका झाली. आता या दोन संघात 27 जुलैपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघाच्या गोटातून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मायदेशी परतला आहे. त्याला या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआय संघव्यवस्थापनाने घेतला असल्याचे समजतच आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार कसोटी मालिकेनंतर आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी यांच्यासह सिराजही भारतात परतला. अश्विन, रहाणे, केएस भरत आणि सैनी यांचा वेस्ट इंडिज दौऱ्यातील केवळ कसोटी मालिकेसाठी संघात समावेश होता.
दरम्यान, सिराजचा याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. या मालिकेसाठी यापूर्वीच मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आलेली आहे.
त्याचमुळे सिराज वनडे मालिकेतील महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. पण त्याच्यावरील वर्कलोडचा विचार करता बीसीसीआयने त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. सिराज वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेनंतर होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाही. त्याचमुळे तो परत भारतात परतला आहे.
तथापि, सिराज मायदेशी परतला असला, तरी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारताकडे वेगवान गोलंदाजीसाठी जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्याही काही षटके गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचे पुढील वर्षभराचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. अशात बीसीसीआय खेळाडूंवरील वर्कलोडचाही विचार करत आहे. सिराज या दौऱ्यापूर्वी आयपीएल 2023 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामन्यातही खेळला. तसेच तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यातही खेळला.
त्याचबरोबर आगामी आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप लक्षात घेता, सिराजला विश्रांती देण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मुकेश कुमार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.