Indian Team Twitter/ @yuzi_chahal
क्रीडा

IND vs SL 3rd ODI: भारतीय संघात मोठा बदल; या पाच खेळाडूंची झाली 'एन्ट्री'

टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाने (Indian Team) श्रीलंकेवर (Sri Lanka) 3 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. त्यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही संघ आर. प्रेमदासा स्टेडियमवर (R. Premadasa Stadium) आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियासमोर निर्भेळ यशाचं तर लंकेसमोर प्रतिष्ठा राखण्याचे ध्येय असणार आहे. आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियात पाच खेळाडूंचे पदार्पण

मालिकेमध्ये विजयी आघाडी घेतल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये बदल होणार हे अपेक्षितच होते. त्यानुसार भारतीय संघामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच खेळाडू एकदिवसीय सामन्यामध्ये पदार्पण करत आहेत. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम, राहुल चहर यांना एकदिवसीय कॅप देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला आजच्या या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही आपल्या संघामध्ये तीन मोठे बदल केले आहेत. प्रवीण जयविक्रमा, अकिला धनंजया आणि रमेश मेंडीस यांना आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT