Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: टी-20 मालिकेतून 'या' स्टार फलंदाजाची उडणार दांडी, हार्दिक पांड्या... !

India vs Sri Lanka: भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 3 जानेवारीपासून मुंबईत खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Sri Lanka T20 Series: भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 3 जानेवारीपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. यासाठी संघाची निवड करण्यात आली असून कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, एक खेळाडू असाही आहे, ज्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणे कठीण जात आहे.

टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत अष्टपैलू हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वर्षातील पहिल्या मालिकेत टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून देण्याची जबाबदारीही त्याच्यावर असेल.

हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी

भविष्यातील टी-20 कर्णधार म्हणून आपले स्थान निश्चित करण्याची जबाबदारीही हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) असेल. अशा परिस्थितीत तो या तीन सामन्यांच्या मालिकेत प्रयोग करणे टाळेल. टी-20 मालिकेसाठी संघात अनेक युवा खेळाडूंची निवड झाली असली तरी अनुभवी क्रिकेटपटूंवर विश्वास ठेवण्यास हार्दिक मागे हटणार नाही. प्रयोग करुन यश मिळाले तर तो हार्दिकच्या कौतुकाचा विषय ठरेल.

भारत (संभाव्य प्लेइंग-11): ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT