Bhuvneshwar Kumar Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: 'या' खेळाडूने संपवली भुवनेश्वरची कारकीर्द! द्रविड-पांड्याचा भरवसा हाय ना...

IND vs SL, 2023: दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारचे भारताच्या T20 संघात पुनरागमन जवळजवळ अशक्य आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Sri Lanka, 2023: टीम इंडियाच्या एका धडाकेबाज आणि धोकादायक क्रिकेटरने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची टी-20 कारकीर्द अचानक जवळजवळ संपवली आहे. हा क्रिकेटपटू अचानक टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक पांड्याचा सर्वात विश्वासू बनला आहे. त्यामुळे आता भारताच्या T20 संघात या धोकादायक खेळाडूचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारचे भारताच्या T20 संघात पुनरागमन जवळजवळ अशक्य आहे.

या खेळाडूने भुवनेश्वरची कारकीर्द संपवली!

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) बहुतेक सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचे कारण बनला आहे. त्यामुळे आता भुवनेश्वर कुमार टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकत नाही. दुसरीकडे, बहुतेक क्रिकेट चाहत्यांना भुवनेश्वर कुमारला टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करायचे आहे. भुवनेश्वर कुमारने त्याच्या शेवटच्या 10 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त 6 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच, भुवनेश्वर कुमारने त्याच्या शेवटच्या 10 T20 आंतरराष्ट्रीय डावांपैकी 5 मध्ये एकही बळी घेतलेला नाही, यावरुन हा वेगवान गोलंदाज किती फ्लॉप ठरला याचा पुरावा आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषक 2022 आणि आशिया कप 2022 मध्ये भारताच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायकही भुवनेश्वर कुमार ठरला होता.

द्रविड-पांड्याचा सर्वाधिक भरवसा

मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आणि 4 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले. शिवम मावीने पदार्पणाच्या सामन्यातच हा मोठा पराक्रम करुन दाखवला आहे. शिवम मावी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांचा सर्वात विश्वासू बनला आहे. त्याने त्याच्या झंझावाती कामगिरीमुळे अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची टी-20 कारकीर्द जवळपास संपुष्टात आणली आहे. आता जर शिवम मावी टीम इंडियात असेल तर भुवनेश्वर कुमारचे भारताच्या T20 संघात पुनरागमन जवळपास अशक्य दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT