Team India's Captain Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka ODI: कॅप्टन रोहित स्पष्टच बोलला, गिलसाठी द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूला डच्चू

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिलला सलामीला संधी दिली जाणार असल्याचे रोहित शर्माने स्पष्ट सांगितले आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेला मंगळवारी सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने संघ संयोजनाबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत. या मालिकेतून रोहित देखील दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

या मालिकेदरम्यान सलामीसाठी शुभमन गिलला ईशान किशनऐवजी पसंती दिली जाणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये कोणाला संधी मिळणार हा मोठा पेच आहे.

गिल आणि किशन यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, 'दोघेही चांगले आहेत. पण गिलला संधी देणे योग्य राहिल, जेणेकरून त्याला काही धावा करण्याची संधी मिळेल. गेल्या काही सामन्यांमध्ये गिल आणि इशान यांनी खूप धावा काढल्या आहेत. ईशानने तर द्विशतकही केले आहे. हे मोठे यश आहे. पण यापूर्वीही ज्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याला संधी देणे योग्य असेल.'

'ईशानला न खेळवणे दुर्दैवी असेल. पण गेल्या 8-9 महिन्यात ज्याप्रकारे गोष्टी झाल्या आहेत, ते पाहाता गिलला संधी देणे योग्य असेल. त्याने सलामीला चांगली कामगिरी केली आहे. जरी ईशानला संधी मिळाली नाही, तरी तो कोणत्याही गोष्टीतून बाहेर झालेला नाही. आम्ही संघात सर्वांना संधी देऊन पाहाणार आहोत, पुढे अनेक सामने खेळायचे आहेत.'

ईशानने गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील सामन्यांत द्विशतकी खेळी केली होती. तो वनडेत द्विशतक करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला होता.

त्याचबरोबर मधल्या फळीतील पेचाबद्दल रोहित म्हणाला, 'अशी डोकेदुखी असणे चांगेल आहे. आम्ही वनडे क्रिकेटमध्ये आणि कोणत्या परिस्थितीत कोणी चांगली कामगिरी केली आहे, हे पाहू. समस्या तेव्हा होतात, जेव्हा तूम्ही वेगवेगळ्या प्रकारांची तुलना करू लागता.'

'आम्ही शेवटच्या 8-9 महिन्यांमध्ये काय झाले आहे, त्याचा विचार करू. वनडेमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याला संधी मिळेल. आम्ही वेगवेगळ्या प्रकारात खेळलेल्या खेळाडूंची तुलना करू. लय महत्त्वाची आहे, पण क्रिकेट प्रकार देखील महत्त्वाचा आहे. वनडे क्रिकेट वेगळा प्रकार आहे. टी20 क्रिकेटपेक्षा तो थोडा मोठा आहे. ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे, त्याला नक्कीच संधी दिली जाईल.'

दरम्यान आता गेल्यावर्षभराचा विचार करायचा झाल्यास वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी सूर्यकुमारपेक्षा वरचढ राहिली आहे. त्यामुळे पहिल्या वनडेत तरी श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT