Axar Patel took stunning catch Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: हवेत सूर मारत अक्षर पटेलने घेतला अप्रतिम कॅच, पाहा Video

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत अक्षर पटेलने घेतलेल्या शानदार कॅचने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना गुरुवारी झाला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात अक्षर पटेलने शानदार झेल घेतले. त्याच्या एका झेलाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. यावेळी अक्षर पटेलने उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात तीन झेल घेतले. यातील दोन झेल त्याने उमरान मलिकच्या गोलंदाजीवर घेतले, तर एक झेल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर घेतला.

यातील त्याने चमिका करुणारत्नेचा घेतलेला झेल अप्रतिम होता. त्याच्या या झेलाचे कौतुकही झाले.

(Axar Patel took stunning catch of Chamika Karunaratne)

श्रीलंकेच्या डावातील ३४ व्या षटकात उमरान गोलंदाजी करत होता. त्याने वेगात टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर करुणारत्नने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

पण पाँइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षरने त्याच्या डाव्या बाजूला हवेत झेल घेतली आणि चेंडू पकडला. त्यामुळे करुणारत्नेला १७ धावांवर माघारी परतावे लागले. यापूर्वी अक्षरने या सामन्यात वनिंदू हसरंगा आणि दसून शनाका यांचेही झेल घेतले होते.

दरम्यान, अक्षरने गोलंदाजीतही त्याचे योगदान दिले. त्याने धनंजय डी सिल्वाला शुन्यावर १८ व्या षटकात त्रिफळाचीत केले होते.

या सामन्यात अक्षर व्यतिरिक्त कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनीही चांगले गोलंदाजी प्रदर्शन केले. कुलदीप आणि सिराज या दोघांनीही प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. कुलदीपला या सामन्यासाठी भारतीय संघात युजवेंद्र चहलच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

तसेच या सामन्यात उमरान मलिकने २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकातच २१५ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून नुवानिदू फर्नांडोने अर्धशतकी खेळी केली. विषेश म्हणजे हा त्याचा पहिलाच वनडे सामना आहे. त्याने ५० धावा केल्या. तसेच कुशल मेंडिसने ३४ आणि वालालागेने ३२ धावांची खेळी केली. या तिघांशिवाय कोणालाही ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

दरम्यान, भारताने पहिला सामना जिंकून या मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसरा सामना जिंकून भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी होती, तर श्रीलंकेला मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT