India vs Sri Lanka, 3rd ODI Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: तिसऱ्या वनडेत बेंच स्ट्रेंथ आजमवणार टीम इंडिया? अशी असेल Playing XI

तिसऱ्या वनडेत कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन, जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका संघात रविवारी वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रंगणार आहे. तिरुअनंतपुरम येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ बेंच स्ट्रेंथ आजमवण्याची शक्यता आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशावेळी पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.

(India vs Sri Lanka, 3rd ODI: Predicted Playing XI)

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अशात तिसऱ्या वनडेसाठी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही विश्रांती देऊन त्यांच्या जागेवर सूर्यकुमार आणि ईशान खेळू शकतात.

तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी सलामीला कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याही संघात कामय राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अक्षर पटेलऐवजी तिसऱ्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरला आजमावले जाऊ शकते. तो देखील फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान देऊ शकतो.

तसेच जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीवर आगामी काळात येणाऱ्या वर्कलोडचा विचार करता त्यालाही तिसऱ्या वनडेत विश्रांती दिली जाऊ शकते. शमीच्या जागेवर अर्शदीप सिंग प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो.

याशिवाय उमरान मलिक, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव संघात कायम राहू शकतात. कुलदीपने दुसऱ्या वनडेत दुखापतग्रस्त युजवेंद्र चहलच्या चागेलवर संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या वनडेसाठीही पहिली पसंती मिळू शकते.

या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकल्याने तिसऱ्या वनडेतही विजय मिळवून भारतीय संघ निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. पण श्रीलंका संघही प्रतिष्ठा वाचवण्याच्या दृष्टीने तिसरा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, उमरान मलिक, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT