India vs Sri Lanka, 3rd ODI Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: टीम इंडियात दोन बदल, सूर्यकुमारलाही संधी; पाहा दोन्ही संघांची Playing XI

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामना रविवारी तिरुअनंतरपुरमला खेळला जाणार आहे. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी दोन्ही संघांनी बदल केले आहेत. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून हार्दिक पंड्या आणि उमरान मलिक यांना बाहेर करण्यात आले आहे.

त्यांना विश्रांती देऊन सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. सूर्यकुमारला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये संधी दिली नव्हती. पण अखेर त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली आहे.

तसेच श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये धनंजय डी सिल्वाच्या जागेवर अशेन बंडाराला आणि जेफ्री वेंडरसेला दुनिथ वेलालागेच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तसेच श्रीलंका या मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यासाठी तिसऱ्या सामन्यात प्रयत्नशील असेल.

दरम्यान, भारतीय संघाने जर या सामन्यात विजय मिळवला, तर भारताचा श्रीलंकेविरुद्धचा हा वनडेतील 96 वा विजय असेल. त्यामुळे वनडेत एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांमध्ये भारतीय संघ अव्वल क्रमांकावर येऊ शकतो.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

श्रीलंका संघ - अविष्का फर्नांडो, नुवानिदू फर्नांडो, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), अशेन बंडारा, चरिथ असलंका, दसुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, जेफ्री वेंडरसे, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, लाहिरू कुमारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..अखेर ‘आरजीपी’ची वेगळी चूल! काँग्रेससोबत न जाण्‍याचा निर्णय; 28 उमेदवारांचा प्रचार सुरू

Arpora: 'मला पोलिसांनी मंदिरातून उचलले'! हडफडेचे सरपंच कारवाईमुळे संतप्त; भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले सूतोवाच

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

SCROLL FOR NEXT